Shivshahi Bus Fire : ठाणे स्टेशनवर ‘शिवशाही’ बसला भीषण आग; १५ प्रवासी थोडक्यात बचावले

ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील सेटीस ब्रिजवर आज म्हणजेच गुरुवार २३ एप्रिल रोजी ‘शिवशाही’ बसला अचानक भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. उन्हाच्या तडाख्यात आधीच त्रस्त असलेल्या प्रवाशांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले.


मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्याहून पालघरमार्गे बोईसरकडे निघालेली ही बस स्टेशनजवळ येताच अचानक बंद पडली. त्यानंतर बसच्या खालच्या भागातून, विशेषतः इंजिन आणि डिझेल टाकीजवळून धूर निघू लागला आणि काही क्षणांतच बसने पेट घेतला. प्राथमिक अंदाजानुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



घटनेच्या वेळी बसमध्ये सुमारे १५ प्रवासी होते. मात्र आग लागल्याचे लक्षात येताच सर्व प्रवाशांनी तत्काळ बसमधून बाहेर पडत धाव घेतली. त्यामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आणि सर्व प्रवासी सुखरूप बचावले.





आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी पाण्याच्या जोरदार फवाऱ्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. स्थानिक नागरिकांनीही मदतीसाठी धाव घेत अग्निशमन दलाला सहकार्य केले.



मात्र आग प्रचंड भडकलेली असल्याने बस पूर्णपणे जळून खाक झाली. घटनास्थळी बसचा फक्त सांगाडा उरल्याचे दिसून आले. या घटनेमुळे काही काळ वाहतूक व प्रवाशांची हालचाल विस्कळीत झाली होती.

Comments
Add Comment

Nitesh Rane : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; मंत्री नितेश राणेंची गर्जना

मुंबई : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; अशी गर्जना मंत्री नितेश राणे यांनी केली. ते हिंदू रक्षक

CM Devendra Fadnavis : 'भारताचे संविधान आणि लोकशाही प्रत्येक व्यक्तीला मोठी संधी देऊ शकते'

नागपूर : तरुणांना मुख्यमंत्री किंवा

Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग

Dog Attack : दोन वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला

बीड : बीड शहरातील शिवतेज नगर भागात रेणू हॉस्पिटल परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी