Muthoot Finance : मुथूट फायनान्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण; तिमाही निकालानंतर गुंतवणूकदारांची चिंता वाढली

मुंबई: गोल्ड लोन क्षेत्रातील आघाडीची कंपनी मुथूट फायनान्सच्या शेअर्समध्ये सोमवारी मोठी घसरण झाली. कंपनीच्या जून तिमाहीतील अपेक्षेपेक्षा कमकुवत आर्थिक निकालांनंतर गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला. यामुळे दिवसभराच्या व्यवहारात कंपनीचा शेअर तब्बल 11 टक्क्यांपर्यंत घसरला. (Share Market)


व्यवहारादरम्यान मुथूट फायनान्सचा शेअर सुमारे ₹2,783.60 पर्यंत खाली आला. या घसरणीमुळे 2026 या वर्षात आतापर्यंत कंपनीच्या शेअरमध्ये 25 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर पडली आहे. (Muthoot Finance)


कंपनीच्या पहिल्या तिमाहीतील निकालांमध्ये निव्वळ व्याज मार्जिन (NIM) आणि नफ्यावर दबाव दिसून आला. बाजारातील विश्लेषकांच्या अपेक्षेपेक्षा निकाल कमी राहिल्याने अनेक ब्रोकरेज कंपन्यांनी कंपनीबाबतचा आपला दृष्टिकोन बदलला. त्यानंतर शेअरवर विक्रीचा दबाव आणखी वाढला. (Share market Latest News)



सध्या मुथूट फायनान्सचा अभ्यास करणाऱ्या 26 विश्लेषकांपैकी 14 जणांनी 'Buy', 7 जणांनी 'Hold' आणि 5 जणांनी 'Sell' रेटिंग दिले आहे. मात्र, अलीकडील निकालानंतर काही प्रमुख ब्रोकरेज कंपन्यांनी लक्ष्य किंमतीत कपात केली आहे.


जेफरीजने कंपनीचे रेटिंग 'Buy' वरून 'Hold' केले असून लक्ष्य किंमत ₹4,350 वरून ₹3,300 पर्यंत कमी केली आहे. निर्मल बंगनेही 'Buy' ऐवजी 'Hold' रेटिंग देत लक्ष्य किंमत ₹4,265 वरून ₹3,000 केली आहे. इन्व्हेस्टेकने 'Sell' रेटिंग कायम ठेवत लक्ष्य किंमत ₹3,300 वरून ₹3,150 पर्यंत कमी केली आहे. तर CLSA नेही लक्ष्य किंमत ₹4,600 वरून ₹4,000 केली आहे. (Brokeage)


बाजार विश्लेषकांच्या मते, कर्जावरील परतावा कमी होणे, कमी व्याजदरावर जुन्या कर्जांचे नूतनीकरण, वाढती स्पर्धा आणि प्रतिस्पर्धी कंपन्यांकडून करण्यात आलेली व्याजदर कपात याचा कंपनीच्या नफ्यावर परिणाम झाला आहे. याशिवाय सोन्याच्या किमतींतील मर्यादित वाढही व्यवसायासाठी आव्हान ठरत आहे.


तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, या सर्व कारणांमुळे चालू आर्थिक वर्षात कंपनीच्या प्रति शेअर उत्पन्नातील (EPS) वाढ मर्यादित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अल्पकालीन काळात मुथूट फायनान्सच्या शेअरवर दबाव कायम राहू शकतो.


Comments
Add Comment

Nitesh Rane : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; मंत्री नितेश राणेंची गर्जना

मुंबई : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; अशी गर्जना मंत्री नितेश राणे यांनी केली. ते हिंदू रक्षक

CM Devendra Fadnavis : 'भारताचे संविधान आणि लोकशाही प्रत्येक व्यक्तीला मोठी संधी देऊ शकते'

नागपूर : तरुणांना मुख्यमंत्री किंवा

Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग

Dog Attack : दोन वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला

बीड : बीड शहरातील शिवतेज नगर भागात रेणू हॉस्पिटल परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी