Nashik TCS Case : TCS नाशिक प्रकरणात पाच आरोपींना सशर्त जामीन

Nashik TCS Case : नाशिक येथील बहुचर्चित TCS कंपनीमधील लैंगिक छळ आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणातील पाच आरोपींना नाशिक न्यायालयाने (Nashik Court) जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणातील आरोपपत्र दाखल झाले असून तपास जवळपास पूर्ण झाला असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमित विनायक खरकर हा निकाल दिला आहे.



पाच आरोपींना सशर्त जामीन


(Amit Vinayak Kharkar) यांनी रझा रफीक मेमन (Raza Rafiq Memon) , आसिफ आफताब अन्सारी (Asif Aftab Ansari) , शाहरुख हुसेन शौकत कुरेशी (Shahrukh Hussain Shaukat Qureshi) , शफी भिकन शेख (Shafi Bhikan Shaikh) आणि तौसिफ बिलाल अत्तार (Tausif Bilal Attar) यांच्या जामीन अर्जांना मंजुरी दिली. मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या विविध गुन्ह्यांमध्ये त्यांना जामीन देण्यात आला आहे. आरोपींना जामीन दिल्यास ते साक्षीदारांना धमकावतील किंवा पुराव्यांमध्ये छेडछाड करतील, अशी गंभीर शक्यता नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. (Nashik TCS Case)



जमीन देताना कोणत्या अटी घातल्या ?


जामीन मंजूर करताना न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत. त्यानुसार, खटल्याचा निकाल लागेपर्यंत प्रत्येक शनिवारी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत आरोपींनी संबंधित पोलीस ठाण्यात (Police station) हजेरी लावणे बंधनकारक राहील. तसेच, आरोपींना तक्रारदार महिलेच्या कार्यस्थळाजवळ किंवा राहत्या परिसरात जाण्यास, तिच्याशी किंवा साक्षीदारांशी संपर्क साधण्यास तसेच प्रकरणाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीशी संपर्क ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. (Nashik TCS Case)



नऊ गुन्ह्यांचा SIT कडून तपास सुरु


दरम्यान, TCS नाशिक कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक छळ, सक्तीच्या धर्मांतराचा प्रयत्न, धार्मिक भावना दुखावणे, विनयभंग आणि मानसिक छळाशी संबंधित एकूण नऊ गुन्ह्यांचा विशेष तपास पथक (SIT) तपास करत आहे. याप्रकरणी TCS कंपनीने स्पष्ट केले आहे की, कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारच्या छळवणूक किंवा सक्तीविरोधात 'शून्य सहनशीलता' (Zero Tolerance) धोरण आहे. तसेच, लैंगिक छळाच्या आरोपांमध्ये नाव आलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; मंत्री नितेश राणेंची गर्जना

मुंबई : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; अशी गर्जना मंत्री नितेश राणे यांनी केली. ते हिंदू रक्षक

CM Devendra Fadnavis : 'भारताचे संविधान आणि लोकशाही प्रत्येक व्यक्तीला मोठी संधी देऊ शकते'

नागपूर : तरुणांना मुख्यमंत्री किंवा

Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग

Dog Attack : दोन वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला

बीड : बीड शहरातील शिवतेज नगर भागात रेणू हॉस्पिटल परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी