Heatwave in Odisha : ओडिशात उष्णतेचा कहर; झारसुगुडा ठरले देशातील सर्वाधिक तापमानाचे शहर

देशात सध्या उष्णतेची तीव्र लाट उसळली असून ओडिशा राज्य या उष्णतेच्या तडाख्यात सापडले आहे. किनारपट्टीपासून ते पश्चिमेकडील जिल्ह्यांपर्यंत तापमानाने विक्रमी पातळी गाठली आहे. बुधवारी (२२ एप्रिल) झारसुगुडामध्ये ४४.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, जे देशातील सर्वाधिक होते. तर राजधानी भुवनेश्वरमध्येही पारा ४१.२ अंशांवर पोहोचला. हवामान विभागाने पुढील पाच दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याचा इशारा दिला आहे.



कोठे अलर्ट जारी?


गुरुवारी झारसुगुडा, संबलपूर आणि बोलांगीर जिल्ह्यांसाठी हीटवेव्हचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय १७ जिल्ह्यांना ‘यलो वॉर्निंग’ देण्यात आली आहे. यामध्ये गंजाम, गजपती, नयागड, खुर्दा, कटक, पुरी, केंद्रपाडा, जगतसिंहपूर, जाजपूर, भद्रक, बालासोर, अनुगुल, बौध, सोनपूर, सुंदरगड यांचा समावेश आहे.



टॉप ३ सर्वाधिक तापमान असलेली शहरे:


झारसुगुडा – ४४.६°C (देशात सर्वाधिक)
ढेंकनाल – ४३.२°C
भुवनेश्वर – ४१.२°C



सकाळी ८ नंतर बाहेर पडणे कठीण :


उष्णतेच्या तीव्रतेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी सकाळी ८ वाजल्यानंतर घराबाहेर पडणेही कठीण होत आहे. नागरिक आपापल्या कामाच्या वेळा बदलत असून, उन्हापासून बचावासाठी विविध उपाययोजना करत आहेत.



रस्ते ओस पडले; कामगारांवर मोठा परिणाम :


दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट दिसत असून फक्त अत्यावश्यक कामासाठीच लोक बाहेर पडत आहेत. विशेषतः मजूर, कारखान्यातील कामगार आणि मोकळ्या जागेत काम करणाऱ्यांना उष्णतेचा सर्वाधिक फटका बसत आहे. वारंवार विश्रांती घेणे, पाणी पिणे आणि सावलीत थांबणे हीच त्यांची गरज बनली आहे.

Comments
Add Comment

Weather Update : मंगळवारी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली : उद्या म्हणजेच मंगळवारी ११ ऑगस्ट २०२६ रोजी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज

Minister Rajnath Singh : ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ उत्साहात संपन्न; दिल्लीत ८०० शिवसैनिकांचे ‘महारक्तदान’; संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांकडून रक्तवीरांचा गौरव

- सैनिकांसाठी महाराष्ट्रातून १६ हजार जणांची नोंदणी नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम आणि

DRDO Kaveri 2.0 : अमेरिकेच्या इंजिन विलंबाला भारताचा ‘स्वदेशी’ मास्टरस्ट्रोक! तेजस Mk1A साठी DRDOचा कावेरी 2.0 तयार; IAFची मोठी चिंता दूर होणार

नवी दिल्ली : भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजस Mk1Aच्या उत्पादनाला अमेरिकन GE F404 इंजिनांच्या विलंबामुळे अडथळे

Rajnath Singh : ‘रक्तदान करणारे योद्धे’, राजनाथ सिंहांकडून महाराष्ट्रातील रक्तदात्यांचे कौतुक!

नवी दिल्ली : देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी रक्तदान करणाऱ्या महाराष्ट्रातील रक्तदाते योद्धे आहेत,

Indian fishermen in Pakistan : पाकिस्तानच्या तुरुंगात १९८ भारतीय मच्छीमार अद्याप बंदिस्त

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानच्या समुद्रसीमेवर मासेमारी करताना चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याच्या आरोपावरून

Jharkhand Exam Scam : झारखंडमध्ये परीक्षांमधील अनियमिततेवर तिढा कायम

नवी दिल्ली : झारखंडमध्ये परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात सुरू असलेला वाद आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन