Actor Vipul Roy : घरकामाच्या आड चोरीचा प्लॅन; मोलकरणीने अभिनेता विपुल रॉयचे लंपास केले लाखो रुपये

मुंबई : जिच्यावर विश्वास ठेवला त्याच मोलकरणीने एका अभिनेत्याचा विश्वासघात केला. मोलकरणीने घरातून लाखो रुपये आणि दागिने लंपास केले आहेत. भारतीय तसेच परदेशी चलन देखील चोरीला गेले असल्याने यांची एकूण किंमतही अंदाजे ७.१० लाख रुपये आहे. या प्रकरणी खार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालं असून पोलीस त्या स्त्रीचा शोध घेत आहेत.



नेमकं घडलं काय?


टीव्ही अभिनेता विपुल रॉय आपली पत्नी आणि मुलीसह खार पश्चिम येथील एस.व्ही रोडवरील 'कलानिकेतन' च्या १० मजल्यावर फ्लॅट १००१ मध्ये राहतो. घरातील कामांसाठी, साफसफाई साठी मदत मिळावी म्हणून तो अनेकदा अर्बन कंपनीच्या द्वारे घरकाम करणाऱ्या व्यक्तींची मदत घेत असे. तसवयीप्रमाणे अभिनेत्याने ६ एप्रिलला घरकाम करण्यासाठी अर्बन कंपनीच्या माध्यमातून दीपाली संजय खरवा या महिलेची मदत घेतली.




मोलकरणीची घरात ये-जा असायची


जेव्हा अर्बन कंपनीची मदत घेतली तेव्हा नेहमी मी दिपाली खरवा यांनाच बोलावले होते. याआधीही त्यांनी अनेकदा आमचे घरचे काम केले होते म्हणून यावेळी देखील त्यांनाच बोलावले, ३-४ वेळा जेव्हा काम करायला आली तेव्हा त्या वेळी संपूर्ण घराची रेकी तिने केली, घरात कोणती वस्तू कुठे असते यांची संपूर्ण माहिती तिला होती. परंतु मोलकरणीने याच माहितीचा फायदा घेत अभिनेत्याला लाखोंचा गंडा घातला.



६ एप्रिल ला नक्की काय घडले ?


६ एप्रिलला दिपाली बेडरूमची साफसफाई करत होती. त्याच वेळी अभिनेता बेडरूम मध्ये प्रवेश करत असताना ओले पाय घेऊन खोलीत येऊ नका असे तिने सांगितले, ती सांगते म्हणून अभिनेता काही आतमध्ये गेला नाही, यानंतर तिने साफसफाई करत आहे असे सांगून कपाटातील दागिने आणि पैसे यांच्यावर आपले हात साफ केले. ही सफाई १५ मिनिटात केली आहे असे अभिनेत्याचे म्हणणे आहे.




पोलीस चौकशी


रात्री १० वाजता अभिनेत्याचे आपल्या बेडरूमचे कपाट खोलताच कपाटातले पैसे परदेशी चलन त्याला गायब झाल्याचे कळले. आणि संशय आला तो अर्बन कंपनीने पाठवलेल्या त्या स्त्रीवर, तक्रारीनुसार विपुल रॉयचे ३० अमेरिकन डॉलर्स, ७००० यूएई दिरहम्ह्स , १४,५०० थाई बाहत आणि रोख ६ लाख रुपये चोरीला गेले आहेत. तसेच दागिने, हिऱ्यांच्या अंगठ्या देखील चोरीला गेल्या आहेत. एकूणच ७.१० लाख रुपये किमतीच्या वस्तूंची चोरी झाली आहे.



विपुल रॉय विषयी थोडक्यात


F. I. R या मालिकेत भोला पंडित, ही भूमिका गाजल्यामुळे त्याला लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तो एक एन्जाबी चित्रपटातही झळकला होता. यासोबतच तुझको हे सनम झिंदगी, डॉ. मधुमती ऑन ड्युटी, साहेब बीवी और बॉस, पार्टनर्स ट्रबल होगयी डबल आणि चेहरा यांसारख्या मालिकांमध्येही काम केले आहे.

Comments
Add Comment

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Xi Jinping : ब्रिक्स परिषदेसाठी शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; ४०० लोकांचे शिष्टमंडळही येणार

बीजिंग : पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे