मुंबई : 'कैसे हराया' या वाक्याने प्रसिद्ध झालेली मुंब्राची एमआयएमची नगरसेविका सहर शेख सध्या मराठीच्या कात्रीत अडकली आहे. इतकी वर्ष मुंबईत राहूनही मुंब्र्याच्या नगरसेविकेला मुंबई भाषाच मराठी येऊ नये ही खरंच लज्जास्पद गोष्ट आहे.
मराठी ही मुंबईची भाषा आहे, इथे राहणारे प्रत्येक धर्माचे लोक अस्खलीत मराठी बोलतात, इतकी वर्ष महाराष्ट्रात राहूनही सहरला मराठी बोलता येत नाही. मुंब्रामध्ये वर्षनुवर्षं राहणारी एमआयएमची नगरसेविका सहर शेख हिलाच जर मराठी येत नसेल तर ती मुंब्राचा काय विकास करणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
ठाणे : ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांना थेट आव्हान देणारे युनूस शेख (Yunus Shaikh) आणि ...
सहर शेख हिने नुकतीच पत्रकार परिषद घेतली, त्यात एका पत्रकाराने मराठीतून प्रश्न विचारला, मराठी वाहिनीसाठी मराठीतून उत्तर द्या अशी विनंती केली असताना मी मराठीतून उत्तर देणार नाही, मला मराठी येत नाही नाही, माझी मराठी चुकली तर मला भीती वाटते की मी ट्रोल होईन, माझ्या तोंडातून जर काही चुकीचे बाहेर पडेल याची मला प्रचंड भीती वाटते म्हणून मी मराठी बोलणार नाही
ठाणे : जानेवारी महिन्यात पार पडलेल्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत ज्यांच्या 'कैसा हराया...' या डायलॉगची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत झाली, त्या ...
सहर शेखच्या या वक्तव्यानंतर तिच्यावर सोशल मीडियातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मुंबईत राहून मराठी येत नाही बोलायला लाज वाटते का? असे प्रश्न विचारले जात आहेत.
सहर शेख यापूर्वी आणखी एका वादात पूर्णपणे अडकली आहे, ते म्हणजे जातीचे प्रमाणपत्र, तिने निवडणूक लढवण्यासाठी वापरलेला OBC जातीचा दाखला बनावट असल्याचा आरोप विरोधकांनी केला. ठाणे तहसीलदारांच्या चौकशीच्या अहवालानुसार तिच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
आरोप कितीही फेटाळले जात असले तरी सत्य लवकलरच बाहेर येईल. जातीचा दाखला अवैध ठरल्यास तिचे नगरसेवक पदाला ती कायमची मुकणार आहे.






