Satara IT Park : सातारा जिल्ह्यात आयटी पार्क उभारणार

मुंबई : सातारा जिल्ह्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देण्यासाठी मौजे नागेवाडी (ता. सातारा, जि. सातारा) येथील गट क्रमांक ३०८/१ मधील सुमारे ४२.५५ हेक्टर आर (आरक्षित) शासकीय जमिनीवर अत्याधुनिक आयटी पार्क उभारण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी पुढाकार घेतला होता. उद्योगमंत्री उदय सामंतांशी चर्चा केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळेच या महत्वपूर्ण कामाला गती मिळाली. आयटी पार्कमुळे सातारा जिल्हा तसेच परिसरातील युवकांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असून, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. तसेच, पुणे-मुंबईसारख्या महानगरांवरील आयटी क्षेत्रातील ताण कमी करण्यास मदत होणार आहे.


प्रस्तावीत आयटी पार्कमध्ये आयटी कंपन्यांसाठी आवश्यक असलेल्या सर्व आधुनिक पायाभूत सुविधा — प्रशस्त रस्ते, वीज, पाणीपुरवठा, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, तसेच कार्यालयीन इमारतींची उभारणी करण्यात येणार आहे. यासोबतच स्टार्टअप्स आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न सुरू आहे. या प्रकल्पामुळे सातारा जिल्ह्याची ओळख एक उदयोन्मुख आयटी हब म्हणून निर्माण होण्याची शक्यता असून, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. तसेच, उद्योग, सेवा क्षेत्र आणि पायाभूत सुविधा विकासालाही या प्रकल्पामुळे बळकटी मिळणार आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : मोरा मच्छीमारांना नुकसानभरपाई द्या; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : जे. एन. पी. ए. मार्फत(JNPA) मार्फत चौथ्या बंदराच्या भरावाच्या कामामुळे मोरा गावातील मच्छीमारांचे झालेले

लग्न जमेना म्हणून तरुणाची भन्नाट कल्पना, थेट बॅनरवर पठ्ठ्याने लिहिलं असं काही की तुम्हांलाही ऐकून धक्का बसेल

पुणे : लग्न जमत नाही म्हणून अनेक तरुण सध्या नैराश्यात दिसत आहे. मुलीच्या तसेच वडिलांच्या एकंदरीतच

भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ, कुटुंबियांचीही वाढणार अडचण; कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर..., हालचालींना वेग

नाशिक : संपूर्ण देशालाच हादरवून सोडणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या (Ashok Kharat) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

Santosh Deshmukh : 'त्यांच्यावर कुटुंबीयांचा दबाव'..., मस्साजोगच्या सरपंचपदाच्या उमेदवाराचा खळबळजनक आरोप

संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या सरपंच संतोष देशमुख ( Santosh Deshmukh ) यांच्या मस्साजोग या गावात राजकीय वातावरण रंगले

Pune Water Supply : पुण्याच्या पाणीकपातीवर प्रशासनाने घेतला हा महत्वाचा निर्णय

पुणे : सूर्याचा प्रकोप हा वाढत जातोय, तापमानाचा पारा इतका वाढलाय की थेट तापमान ४०- ४५ अंशापर्यत जाऊन पोहोचलाय,

Free Registration For Agricultural Land : राज्य सरकारचा मोठा निर्णय; शेतजमिनीच्या वाटणीवरील नोंदणी फी रद्द

मुंबई : राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा देत राज्य सरकारने शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर