भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ, कुटुंबियांचीही वाढणार अडचण; कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर..., हालचालींना वेग

नाशिक : संपूर्ण देशालाच हादरवून सोडणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या (Ashok Kharat) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. महिलांवरील अत्याचार, आर्थिक फसवणूक, अंधश्रद्धेला खतपाणी घालणे असे गंभीर आरोप खरातवर आहे. सध्या भोंदू खरात कोठडीत असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. खरात याच्या कथित आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कारवाईचा वेग वाढवला असून, त्याच्या बेनामी संपत्तीवर टाच आणण्यासाठी कठोर पाऊल उचलली जात आहेत. त्यामुळे आता अशोक खरातसह त्याच्या कुटुंबीयांचीही अडचण वाढणार आहे.



भोंदू खरातकडे कोट्यवधींची मालमत्ता


खरातची किमान १५ ते १७ हजार कोटींची संपत्ती असल्याचा अंदाज आहे. यात कोट्यवधीची बेनामी मालमत्ता आहे. प्राथमिक तपासात बेकायदेशीर मार्गाने मिळवलेली मालमत्ता तात्पुरती जप्त (प्रोव्हिजनल अटॅचमेंट) करण्याची प्रक्रिया 'ईडी'कडून राबवली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पुढील टप्प्यात खरातला समन्स बजावून चौकशी, बैंक खात्यांची तपासणी, आर्थिक देवाणघेवाणीचे विश्लेषण आणि आवश्यकता असल्यास अटकेची कारवाईही केली जाऊ शकते. त्यामुळे एसआयटीकडून ईडीकडे खरातचा (Ashok Kharat) ताबा काही दिवसांपुरता जाऊ शकतो. त्यासाठी ईडी न्यायालयाची परवानगी मागणार आहे. सध्या खरात पाचव्या गुन्ह्यात पोलिस कोठडीत आहे.


ईडीकडून एक स्वतंत्र गुन्हा खरातवर अगोदरच दाखल झालेला आहे. त्यानंतर त्याच्या घरासह कार्यालयावर ईडीने धाड टाकली होती. या चौकशीत खरातचे प्रॉपर्टी रॅकेट समोर आले होते. त्यात आता खरातशी संबंधित शासनातील काही अधिकारी, खासगी ब्रोकर, पुणे व नाशिकमधील काही विकासक रडारवर आहेत. नाशिक-अहिल्यानगर-पुणे (Nashik-Ahilyanagar-Pune) यादरम्यानचे खरातचे प्रॉपर्टी रॅकेट उघड झाल्यानंतर सोलापूरमध्ये देखील खरातने जमीन लाटल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर ईडीकडून अत्यंत सावध पावले उचलली जात असून पहिल्या टप्प्यात खरातचे बँक खाते तात्पुरते सील करण्यात आले.



कुटुंबियांचीही होणार अडचण


अशोक खरात आधीच अडचणीत असताना ईडीने जर खरातच्या एखाद्या मालमत्तेवर तात्पुरती टाच (प्रोव्हिजनल अटॅचमेंट) आणली तर त्याचे कुटुंबीय देखील अडचणीत येतील. कारण असे झालयास खरातच्या मालमत्तेबाबत आणि व्यवहारांवर अनेक निर्बंध येतील. महत्त्वाचे म्हणजे संबंधित मालमत्ता खरात जरी तुरुंगात असला तरी त्याच्या कुटुंबातील वारसदारास अन्य कोणालाही विकता येणार नाही तसेच दुसऱ्याच्या नावावर हस्तांतरण, गिफ्ट किंवा वसीयतद्वारे बदल करणेही बंद होणार आहे. बँकेत कर्जासाठी खरात व त्याच्या पत्नीच्या नावावर असलेली मालमत्ता गहाण ठेवता येणार नाही. याशिवाय कागदपत्रांमध्ये फेरफार करणे किंवा मालमत्ता लपवण्याचे प्रयत्न केल्यास तो कायदेशीर गुन्हा ठरू शकतो.

Comments
Add Comment

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि

Ganeshotsav 2026 Sound Restrictions : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर होणार थेट कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वाच्या