Eknath Shinde : सुनेत्रा पवारांना बहुमताने निवडून आणणे हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली

ठाणे : नेत्रा पवार यांच्यासारख्या सक्षम, संवेदनशील आणि लोकाभिमुख उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना केले. तसे करणे हीच स्वर्गीय अजितदादा पवार यांना खरी श्रध्दांजली ठरेल असेही त्यांनी यावेळी सांगितले. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर बारामती येथे झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला शिंदे यांनी दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.


शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करतांना सुरूवातीला अजित पवारांच्या स्मृतीला अभिवादन केले. अजित पवारांच्या निधनानंतर बारामती मधल्या घराघरांमध्ये आपला माणूस गेल्याची भावना होती. अशा पार्श्वभूमीवर ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा होती, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.


मी तुमच्यासमोर केवळ राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर तुमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून उभा आहे. आपल्याला केवळ लोकप्रतिनिधी निवडायचा नाही, तर आपल्या परिसराचा स्वाभिमान आणि विकासाचा वारसा पुढे नेणारी व्यक्ती निवडायची आहे. अजित पवारांनी बारामतीच्या विकासासाठी कशाप्रकारे मेहनत घेतली आहे हे आपणाला माहितच आहे. आज शिवसेना, महायुतीच्या माध्यमातून आपण सुनेत्रा पवार यांच्यासारख्या सक्षम, संवेदनशील आणि लोकाभिमुख उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी एकत्र आलो असून त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन एकनाथ शिंदे म्हणाले.


सुनेत्रा पवार बारामतीच्या प्रत्येक कुटुंबाचा, शेतकऱ्याचा, महिलांचा आणि तरुणांचा आवाज बनतील असा विश्वास यावेळी एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला. सुनेत्रा पवारांना तुम्ही अनेक वर्षांपासून जवळून पाहिलं आहे. सत्तेत असो किंवा नसो, सामान्यांच्या सुखा-दुःखात धावून जाणं आणि संयमाने प्रश्न सोडवणं हा त्यांचा स्वभाव आहे. राजकारणापेक्षा समाजकारणावर त्यांनी नेहमीच भर दिला. घराची जबाबदारी सांभाळत असतानाच, समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिल्याची भावना एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली.


ही निवडणूक विकासाची आणि विश्वासाची आहे. ज्या हातांनी नेहमी मदतीचा आधार दिला, त्या हातांना आज तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. अजित पवार यांनी बारामतीसाठी केलेल्या विकास कामांची परंपरा अधिक वेगाने पुढे नेण्याचं काम सुनेत्रा पवार करतील. आम्ही सर्वजण एकत्र येऊन बारामतीला आणखी सक्षम, समृद्ध आणि आधुनिक बनवू, अशी ग्वाहीही यावेळी एकनाथ शिंदेंनी दिली.


सुनेत्रा पवार या आपल्या भगिनीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावं. आपल्या डोळ्यासमोर फक्त आपल्या भागाचा विकास आणि येणाऱ्या पिढीचं भविष्य ठेवा. आमचे शिवसैनिक सुनेत्रा वहिनींना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असा विश्वास एकनाथ शिंदेंनी बारामती मधील लाडक्या बहिणी, भावांना दिला. यावेळी मंत्री उदय सामांत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Add Comment

‘Misuse of powers’: राजस्थान उच्च न्यायालयात वादळ! प्रभारी मुख्य न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; SC चे न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे सरन्यायाधीशांना पत्र

नवी दिल्ली : राजस्थान उच्च न्यायालयातील अंतर्गत वाद आणि गैरव्यवहाराचे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या

Maharashtra Pollution Control Board : उद्योग क्षेत्रातील 'लायसन्स राज'ला लगाम

- प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमती शुल्कात कपात; ५ ते २५ वर्षांची रक्कम एकत्रित भरण्याची सोय मुंबई : राज्यातील

Kriti Sanon Raksha Bandhan Ad : ट्रोलिंगचा दणका! क्रिती सेननला बसला मोठा धक्का; वादानंतर ब्रँडने जाहिरातच घेतली मागे

Kriti Sanon Raksha Bandhan Ad  : अभिनेत्री क्रिती सेनन रक्षाबंधनाच्या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली होती. तिच्या

Nepal flood news : नेपाळमध्ये ढगफुटीसदृश भीषण पूर! अनेक गावांसह हजारो नागरिक वाहून गेल्याची भीती; पॉवर प्रोजेक्ट्स, रस्ते आणि पुलांचे मोठे नुकसान

काठमांडू : हिमालयीन देश असलेल्या नेपाळमध्ये निसर्गाचा मोठा प्रकोप पाहायला मिळत आहे. तिबेटच्या सीमेला लागून

Chhattisgarh Social Boycott : एकाच गावातील ३१ जणांचा सामाजिक बहिष्कार; ७ लहान मुलांचाही समावेश, अतिक्रमणाच्या आरोपाची शिक्षा?

धमतरी : छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील तर्रागोंदी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील तब्बल ३१

Unique Grand Opening : नेते अन् अभिनेते सोडाच; सँडविच दुकानाच्या उद्घाटनाला आला चक्क 'रोबोट VVIP'! बाउन्सर अन् ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत

उज्जैन : सध्या तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की, रोबोट्स केवळ कारखान्यांपुरते किंवा संशोधनापुरते मर्यादित