Nida Khan : निदा खान TCS मधून निलंबित, अटकपूर्व जामिनावर पुढील सुनावणी २७ एप्रिलला

नाशिक : कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी संशयित आरोपी निदा खानला टीसीएसने सेवेतून निलंबित केले आहे. पोलीस निदाला शोधत आहे. निदाच्या घरच्यांकडे तिचा ठावठिकाणा जाणून घेण्यासाठी चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर निदाने नाशिक सत्र न्यायालयात (नाशिक सेशन्स कोर्ट) अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. निदाच्या अर्जावर सत्र न्यायालयात सोमवारी २० एप्रिल रोजी सुनावणी झाली पण निर्णय झाला नाही. पुढील सुनावणी २७ एप्रिलच्या सोमवारी होणार आहे.


न्यायालयात सुनावणी प्रलंबित असली तरी टीसीएसने निदा खानला सेवेतून निलंबित केले आहे आणि तिचे कंपनीशी संबंधित सर्व अॅक्सेस काढून घेतले आहेत. पोलिसांनी निदाचा शोध सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


सोमवारी २० एप्रिल रोजी झालेल्या सुनावणी निदाच्या वकिलाने आणि सरकारी वकिलाने आपापली बाजू मांडली तसेच युक्तिवादाचे आणखी मुद्दे मांडण्यासाठी वेळ मागितला. न्यायालयाने पुढील सुनावणी २७ एप्रिलच्या सोमवारी ठेवली आहे.


निदा खान टीसीएसमध्ये प्रोसेस असोसिएट पदावर कार्यरत होती, तिला निलंबित करताना कंपनीने टीसीएसशी संबंधित असलेले तिचे सर्व अॅक्सेस काढून घेतले आहेत. कंपनीशी संबंधित ज्या वस्तू निदाकडे आहेत त्या सर्व तिच्याकडून परत मागण्यात आल्या आहेत. तसेच तिला पुढील आदेशापर्यंत कंपनीसाठी काम करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. हा निलंबनाचा आदेश टीसीएसच्या पुणे, नाशिक, गोवा ब्रँचचे एचआर प्रमुख शेखर कांबळे यांनी काढला आहे.


टीसीएस नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी आतापर्यंत नऊ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. एक गुन्हा पुरुष कर्मचाऱ्याने तर आठ गुन्हे हे महिला कर्मचाऱ्यांनी नोंदवले आहेत. शारीरिक, मानसिक, बौद्धिक छळ तसेच विशिष्ट पदार्थ खाणे, विशिष्ट पोशाख करणे यासाठी वरिष्ठांनी दबाव टाकणे, धर्मांतराची सक्ती, अश्लील आणि आक्षेपार्ह वर्तन, अत्याचार अशा विविध प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद टीसीएस प्रकरणी झाली आहे.

Comments
Add Comment

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे

Prakash Abitkar : राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर, विद्युत आणि इमारत सुरक्षा ऑडिट; आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय

Khelo India : खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

· महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम · पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित मुंबई : हॉकीपटू मेजर

Nitesh Rane : राज्यातील सागरी विकास प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी द्या!

- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम

Ashish Shelar : गडकिल्ले, ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला गती; मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील गडकिल्ले, प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला अधिक गती देण्यासाठी जिल्हा