Iran - America War : अमेरिकेने जप्त केले इराणी मालवाहू जहाज ?

ओमान सागरातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा उघडपणे समोर आला आहे. इराणने अधिकृतपणे पुष्टी केली आहे की अमेरिकेने त्याच्या मालवाहू जहाज तोस्कावर हल्ला करून ते ताब्यात घेतले आहे. तेहरानने या कारवाईला समुद्री दरोडा ठरवत कठोर प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे.


इराणच्या लष्करी मुख्यालय हजरत खातम अल-अंबिया कडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमेरिकन सैन्याने ओमान सागरातील आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात इराणी जहाजावर हल्ला केला. निवेदनानुसार, अमेरिकन मरीन दलाने जहाजावर चढाई करून त्याची नेव्हिगेशन प्रणाली निष्क्रिय केली आणि जहाज जप्त केले.


दरम्यान, अमेरिकन सैन्याच्या युनायटेड स्टेट्स सेंट्रल कमांड (सेंटकॉम) ने या कारवाईचे समर्थन केले आहे. अमेरिकेचा दावा आहे की हे मालवाहू जहाज अमेरिकेच्या नौदल नाकेबंदीचे उल्लंघन करत होते. सेंटकॉमनुसार, गाइडेड-मिसाइल डेस्ट्रॉयर यूएसएस स्प्रूअन्स (DDG-111) ने जहाजाला अडवले आणि अनेकदा इशारा दिला. मात्र जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी आदेशांचे पालन न केल्याने अमेरिकन युद्धनौकेने गोळीबार करून त्याचे इंजिन निष्क्रिय केले. त्यानंतर अमेरिकन मरीन दलाने जहाजावर चढाई करून ते ताब्यात घेतले.



अमेरिकेने ही संपूर्ण कारवाई व्यावसायिक आणि संतुलित असल्याचे म्हटले आहे. तसेच जहाजावर अमेरिकन मरीन तैनात असून, त्यामध्ये कोणता माल आहे याची तपासणी सुरू असल्याचेही सांगितले आहे. या जहाजाचे नाव तोस्का असल्याचे सांगितले जात आहे.डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर म्हटले की, हे जहाज अमेरिकन नौदलाच्या गाइडेड-मिसाइल डेस्ट्रॉयरने ओमानच्या आखातात अडवले. त्याला थांबण्याचा इशारा देण्यात आला होता, मात्र जहाजाने आदेश पाळले नाहीत. त्यानंतर नौदलाने थेट कारवाई करत इंजिन कक्षाला लक्ष्य केले आणि जहाज थांबवले.



ही घटना अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा ट्रम्प यांनी यापूर्वी घोषणा केली होती की अमेरिकन प्रतिनिधीमंडळ सोमवारी पाकिस्तानमध्ये जाऊन इराणसोबत दुसऱ्या फेरीची चर्चा करणार आहे. त्यामुळे दोन आठवड्यांच्या तात्पुरत्या युद्धविरामाला मुदतवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. व्हाईट हाऊसनुसार, उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स अमेरिकन प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व करणार आहेत. त्यांच्या सोबत स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर हेही असणार आहेत. या दोघांनी पहिल्या फेरीतील दीर्घ चर्चेतही सहभाग घेतला होता.

Comments
Add Comment

Pirates kidnap Indians : सागरी चाच्यांचा धुमाकूळ, २२ भारतीयांसह ३० जणांचे अपहरण; येमेन आणि सोमालियाच्या समुद्रातील धक्कादायक घटना

येमेन : येमेन आणि सोमालियाच्या किनाऱ्याजवळ घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सागरी चाच्यांनी दोन व्यावसायिक

China Visa : भारतीयांना व्यावसायिक कामांसाठी चीनला जाणे झाले कठीण

बीजिंग : चीनने भारतीयांसाठी व्यावसायिक व्हिसाच्या नियमांमध्ये बदल के

Imran Khan : इम्रान खान यांना रात्री रुग्णालयात हलवले; वैद्यकीय तपासणीनंतर पुन्हा तुरुंगात पाठवले

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे संस्थापक इम्रान खान यांना रात्री कडक

Mehul Choksi's Lawyer : मेहुल चोक्सीच्या वकिलाच्या अडचणी वाढल्या; लंडनमध्ये लैंगिक अत्याचाराच्या चार आरोपांखाली अटक

लंडन : फरार हिरे व्यावसायिक मेहुल चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांना ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली असून त्यांच्यावर

Kenya Helicopter Crash : केन्यामध्ये सफारीसाठी निघालेल्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; 5 अमेरिकन पर्यटकांसह सर्व 7 जणांचा मृत्यू

नैरोबी : केन्यामध्ये पर्यटकांना सफारीसाठी घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत

Prince Harry Meghan Markle UK Return : सहा वर्षांचा ‘वनवास’ संपणार? प्रिन्स हॅरी आणि मेगन ब्रिटनमध्ये परतण्याच्या तयारीत; मुलं शाही कुटुंबाच्या जवळ जाणार

लंडन : ब्रिटिश शाही कुटुंबापासून दूर झाल्यानंतर तब्बल सहा वर्षांनी प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मार्कल