BJP : भाजपा युवा मोर्चाची युवा शक्ती जागर यात्रा

मुंबई : राज्यातील युवावर्गासह शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या युवक - युवतींशी संवाद साधण्यासाठी 21 एप्रिलपासून राज्यव्यापी युवा शक्ती जागर यात्रेचा प्रारंभ होत असल्याचे भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी घोषित केले. या यात्रेच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण तसेच राज्य सरकारमधील मंत्री उपस्थित राहणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. भाजपा प्रदेश कार्यालयात सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत महाडिक बोलत होते. भाजपा प्रदेश माध्यम प्रमुख गोविंद येतयेकर, सहमाध्यम प्रमुख ओमप्रकाश चौहान यावेळी उपस्थित होते.


युवा शक्ती जागर यात्रेसंदर्भात माहिती देताना महाडिक म्हणाले, दीड महिन्यापूर्वी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर राज्यातील सर्व मंत्री, आमदार, केंद्रातील मंत्र्यांची भेटी घेतल्या. त्याचप्रमाणे दिल्ली विद्यापीठासह अनेक ठिकाणच्या विद्यार्थी आघाड्यांना आमंत्रण दिले. युवा मोर्चाच्या माध्यमातून युवा पिढी जोडण्यासाठी आपल्याला फार मोठी संधी असल्याचे लक्षात आल्याने युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि भाजपा नेत्यांनी परिश्रम घेऊन या राज्यव्यापी युवा शक्ती जागर यात्रेची आखणी केल्याची माहिती महाडिक यांनी दिली.


युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांना भेटतो तेव्हा मला त्यांच्यात उत्साह आणि उर्जा पाहायला मिळत असल्याने या दौऱ्याचे नाव युवा शक्ती जागर यात्रा ठेवले. या संपूर्ण दौऱ्याचे नियोजन विचारपूर्वक केले आहे. त्यात केवळ पदाधिकाऱ्यांना भेटणार नसून शेतकरी, महिलांशी चर्चा करणार आहोत. विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या युवक युवतींना भेटणार आहोत. या सर्व लोकांच्या समस्या जाणून घेत आम्हाला विद्यार्थी, युवा आणि सरकारमधला सेतू व्हायचे आहे. पुढील एक वर्षात संपूर्ण राज्यातील एक लाख युवकयुवतींना या माध्यमातून युवा मोर्चा आणि पक्षाशी जोडण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे महाडिक यांनी सांगितले. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात नवी मुंबई, पनवेल, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असा संपूर्ण कोकण पट्टा पूर्ण केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Types of Earrings : नक्की ट्राय करा 'या' आउटफिटसोबत 'हे' इयररिंग्स

मुंबई : एखादा सुंदर ड्रेस किंवा आकर्षक साडी परिधान केल्यानंतरही लूक पूर्ण वाटत नाही, यामागचे एक महत्त्वाचे कारण

Cooper Hospital : कूपरच्या प्रसाधनगृहात अर्भकाचा मृतदेह, BMC ने दिली मोठी अपडेट

‘मुंबई Mumbai :  कूपरच्या प्रसाधनगृहात अर्भकाचा मृतदेह’ या विषयाच्या अनुषंगाने विविध प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या

FIDE World Cup : फिडेकडून २०२७ विश्वचषकाचे नवे स्वरूप जाहीर; स्पर्धकांच्या संख्येत आणि बक्षीस रकमेत वाढ

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने (फिडे) २०२७ च्या सत्रापासून लागू होणाऱ्या बुद्धिबळ विश्वचषकाच्या

Japan Open 2026 : जपान ओपन बॅडमिंटन २०२६: लक्ष्य सेन आणि आयुष शेट्टीचे पहिल्याच फेरीतच आव्हान संपुष्टात

टोकियो : जपान ओपन २०२६ बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेन आणि आयुष शेट्टी हे दोघेही आपापल्या पहिल्या

Mahaprabhu Jagannath : 'तुमच्या मुलांना हा चित्रपट नक्की दाखवा': बाबा रामदेव यांचे ‘महाप्रभू जगन्नाथ’ला समर्थन; 17 जुलै रोजी देशभर प्रदर्शित होणार

रथयात्रेपूर्वी ‘महाप्रभू जगन्नाथ’च्या निर्मात्यांनी योगगुरू बाबा रामदेव यांचे घेतले आशीर्वाद; 17 जुलै रोजी

Happy and Possitive Home Vibe : घरात कायम आनंद आणि सकारात्मकता हवी? मग या सोप्या गोष्टी नक्की ट्राय करा

मुंबई: धावपळीच्या जीवनात घर हेच प्रत्येकासाठी शांतता आणि समाधान मिळवण्याचं ठिकाण असतं. मात्र तणाव, कामाचा ताण