Ajanta Caves : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला भूतानचे गृहमंत्री लिओन पो शेरिंग यांनी दिली भेट

जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला भूतानचे गृहमंत्री लिओनपो शेरिंग यांनी भेट देत येथील अद्वितीय कला, इतिहास आणि निसर्गसौंदर्याचा मनमुराद आस्वाद घेतला. त्यांचे अजिंठा परिसरात आगमन झाले. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वतीने त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी लेणी क्रमांक १, २, ५, ९, १०, १२, १६, १७ आणि २६ यांचे सविस्तर अवलोकन केले.


अजिंठा लेणीतील भित्तिचित्रांची मोहकता, रंगछटांची सूक्ष्मता आणि प्राचीन कलाकारांच्या कल्पकतेचा अप्रतिम आविष्कार पाहून ते विशेष प्रभावित झाले. शेकडो वर्षांपूर्वी नैसर्गिक रंगांद्वारे साकारलेली चित्रशैली आजही तितकीच जिवंत भासते, याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. दगडात कोरलेली सूक्ष्म शिल्पकला, बुद्धमूर्तींची शांत मुद्रा आणि स्थापत्यकलेतील अचूकता यामुळे लेणींचा प्रत्येक कोपरा इतिहासाची साक्ष देताना दिसतो.



गाईडने त्यांना अजिंठा लेणीतील चित्रशैली, शिल्पकला आणि बौद्ध धर्माशी संबंधित जातक कथांचे सविस्तर विवेचन केले. चित्रांमधून उलगडणाऱ्या जातक कथा, त्यातील भावभावना आणि जीवनमूल्यांचा संदेश याने गृहमंत्री शेरिंग भारावून गेले. हा केवळ ऐतिहासिक वारसा नसून निसर्ग आणि कलेचा अद्वितीय संगम असल्याची भावना भूतानच्या गृहमंत्र्यांनी व्यक्त केली.
Comments
Add Comment

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र

Narendra Modi : 'सेमीकंडक्टरपासून अणुऊर्जेपर्यंत...'; जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला

Independence Day 2026 : तिरंगा, २१ तोफांची सलामी आणि ‘वंदे मातरम्’चा निनाद; लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा दिमाखदार सोहळा

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील ऐतिहासिक लाल

Independence Day 2026 : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google Doodleची खास कलाकृती; भारतीय वस्त्रकलेतून दिसली सांस्कृतिक विविधता

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google ने आपल्या होमपेजवर खास आणि रंगीबेरंगी Doodle सादर करून