Kamgar Hospital : अंधेरीतील 'कामगार रुग्णालय' पूर्ण क्षमतेने सुरू करा

- घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे तसेच रुग्णालय लवकरच सुरु करण्याचे केंद्रीय मंत्री यांचे आश्वासन


मुंबई : अंधेरी (पूर्व) येथील ईएसआयसी (ESIC) कामगार रुग्णालय गेल्या अनेक वर्षांपासून विविध समस्यांच्या गर्तेत अडकले आहे. या रुग्णालयाचे गेल्या अनेक वर्षापासून कोट्यावधी रुपये खर्च करूनही अद्याप अपूर्ण अवस्थेत असलेल्या नूतनीकरणाचे काम तातडीने पूर्ण करून ते पूर्ण क्षमतेने सुरू करावे, अशी आग्रही मागणी मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रवींद्र वायकर यांनी केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवियांची भेट घेऊन पत्राद्वारे केली आहे. केंद्रीय मंत्री यांनी देखील याची गंभीर दाखल घेऊन या संपूर्ण कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे तसेच रुग्णालयाचे अपूर्ण असलेले काम लवकरच पूर्ण करून ते पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचे आश्वासन दिले.



खासदार वायकर यांनी ९ एप्रिल २०२६ रोजी या रुग्णालयाला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी १९८५ मध्ये राज्य सरकारने सुरू केलेले हे रुग्णालय २००८ मध्ये केंद्राच्या अखत्यारीत आले. मात्र, गेल्या १५ वर्षांपासून याचे नूतनीकरण प्रलंबित आहे. ८ वेळा निविदा प्रक्रिया बदलूनही काम पूर्ण झालेले नाही. विलंबामुळे या प्रकल्पाचा खर्च आता मूळ २५४ कोटी रुपयांवर टेंडर पेक्षा जास्त वाढत गेल्याची माहिती, रुग्णालय प्रशासन यांनी खासदार यांना दिली. नियमानुसार केवळ २ मजल्यांची परवानगी असताना तिथे ८ मजल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. या तांत्रिक त्रुटीमुळे रुग्णालयाला अद्याप ताबा प्रमाणपत्र' (OC) मिळालेले नाही, असे हि चर्चे दरम्यान खासदारांच्या निदर्शनास आले. १८ डिसेंबर २०१८ रोजी या रुग्णालयात लागलेल्या आगीत ८ जणांचा मृत्यू झाला होता. इतकी मोठी दुर्घटना होऊनही प्रशासनाने सुरक्षेच्या बाबतीत आणि नूतनीकरणात कमालीची उदासीनता दाखवली असल्याने हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी लवकरच केंद्रीय कामगार मंत्री यांची भेट घेण्याचे आश्वासन कर्मचाऱ्यांना दिले होते. त्यानुसार खासदार वायकर यांनी शुक्रवारी केंद्रीय कामगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांची दिल्ली येथे लोकसभेत भेट घेत याप्रश्नी निवेदन दिले.



खासदारांनी केलेल्या प्रमुख मागण्या :


१. रुग्णालयातील 'अंत:रुग्ण सेवा' (IPD) युद्धपातळीवर सुरू करावी.
२. ९०% काम पूर्ण झालेला ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स तातडीने कार्यान्वित करावा.
३. मुख्य इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर प्रशासकीय कार्यालयांऐवजी स्त्री-पुरुष रुग्ण कक्ष (Wards) सुरू करावेत.
४. किमान एक आपत्कालीन ऑपरेशन थिएटर आणि ५ आयसीयू बेड्स त्वरित सुरू करावेत.
५. जुन्या कर्मचारी वसाहतीची दुरुस्ती करून नवीन कर्मचाऱ्यांसाठी निवासाची व्यवस्था करावी.



अशा मागण्याचा हि या निवेदनात समावेश करण्यात आला आहे. "करोडो रुपये खर्च होऊनही केवळ नियोजनाच्या अभावामुळे कामगारांना उपचारांपासून वंचित राहावे लागत आहे. याप्रकरणी तातडीने बैठक बोलावून दोषींवर कारवाई करावी आणि रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करावे," अशी मागणी खासदार रवींद्र वायकर यांनी केली. त्यानुसार हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने लवकरच सुरु करण्याचे तसेच नुतनीकरणाच्या कामात झालेल्या दिरंगाई तसेचघोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन हि केंदीय मंत्री खासदार यांना दिले.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईत पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू

मुंबई : पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीत घडली. गौतम

Pratap Sarnaik : गणेशोत्सवात स्वस्तात एसटीने गावी जाता येणार

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एसटी बसच्या एकेरी गट आरक्षणावर

Devendra Fadnavis : पोलीस ठाण्यांची ‘अ’, ‘ब’, ‘क’ वर्गवारी करणार

मुंबई : वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेऊन

Vishakha Raut : माजी महापौर विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद धोक्यात जात प्रमाणपत्र ठरवले आहेत

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : माहीम येथील प्रभाग क्रमांक १९१ मधून निवडून आलेल्या उबाटाच्या नगरसेविका माजी महापौर

Private Coaching Center : खासगी शिकवणी केंद्रांच्या नियमनासाठी कायद्याच्या प्रारूप मसुद्यावर ४ सप्टेंबरपर्यंत सूचना-हरकती पाठविण्याचे आवाहन

मुंबई : राज्यातील खासगी शिकवणी केंद्रांच्या नोंदणी व नियमनासाठी स्वतंत्र कायदा करण्याच्या दृष्टीने शासनाने

Mega Block : रविवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; लोकल सेवांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता

Mumbai : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी येत्या रविवारी, दिनांक