High Commissioner : माजी रेल्वे मंत्री झाले बांगलादेशमध्ये भारताचे उच्चायुक्त

नवी दिल्ली : देशाचे माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी आता बांगलादेशमध्ये भारताचे उच्चायुक्त झाले आहेत. त्यांनी प्रणय वर्मा यांच्याकडून बांगलादेशमधील भारताच्या उच्चायुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. प्रणय वर्मा आता ब्रुसेल्समध्ये युरोपीयन संघात भारताचे राजदूत म्हणून काम करणार आहेत.


दिनेश त्रिवेदी एकेकाळी तृणमूल काँग्रेसचे प्रभावी नेते होते. ते ममता बॅनर्जींचे विश्वासू म्हणून यूपीए सरकारच्या काळात १३ जुलै २०११ ते १८ मार्च २०१२ दरम्यान देशाचे रेल्वेमंत्री होते. पण रेल्वेमंत्री म्हणून त्यांनी घेतलेल्या निर्णयावरून वाद झाला. यानंतर दिनेश त्रिवेदी यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. हळू हळू त्यांचे तृणमूलमधील महत्त्व कमी होत गेले. अखेर १२ फेब्रुवारी २०२१ रोजी तृणमूलचा राजीनामा देऊन दिनेश त्रिवेदी बाहेर पडले. त्यांनी ६ मार्च २०२१ रोजी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. आता ७५ वर्षांचे असलेल्या यांनी बांगलादेशमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून नवी जबाबदारी स्वीकारली आहे.


कोणत्याही देशात उच्चायुक्त, राजदूत अशा पदांवर परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्याची नियुक्ती होते. या पदावर एका ज्येष्ठ नेत्याची नियुक्ती करून केंद्र सरकारने बांगलादेश सोबतच्या राजकीय संबंधांना भारत विशेष महत्त्व देतो याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. बंगाली संस्कृतीची जाण असलेल्या दिनेश त्रिवेदी यांना बांगलादेशमध्ये उच्चायुक्त म्हणून काम करणे सोपे जाईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.


उच्चायुक्त नियुक्तीची माहिती मिळताच पश्चिम बंगालमधील भाजपचे सहप्रभारी अमित मालवीय यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आणि दिनेश त्रिवेदींचे नव्या जबाबदारीसाठी अभिनंदन केले.

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील नगरसेवकांना हवाय १ कोटींचा निधी

- नगरसेवक स्वेच्छा निधीची मर्यादा ६० लाखांवरून १ कोटींची करण्याची मागणी - भाजप नगरसेविकेने केली महापालिकेत

Gargai Water Project : गारगाई पाणी प्रकल्पासाठी मेक्सिकोतील कंपनीची सल्लागार म्हणून निवड

- मेक्सिकोतील धरणांचे आणि मुंबईत मेट्रोचे काम पाहणाऱ्या संस्थेवर जबाबदारमुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई

BMC News : परळ,शिवडी,लालबागला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीची पुनर्बांधणी

- पाणी साठ्याची क्षमता १०.३३ दशलक्ष लिटर्स करणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) परळ, शिवडी तसेच लालबाग भागाला पाण पुरवठा

Alexandra Cinema in Nagpada : नागपाड्यातील अलेक्झाड्रा सिनेमागृहाची ओळख कायमचीच मिटणार

- सिनेमागृहाचे आरक्षण बदलून निवासी वापराचे आरक्षण टाकले जाणार; सुधार समितीच्या बैठकीत प्रस्ताव सादर मुंबई

FDA Action on Blinkit : FDAचा ब्लिंकिटवर मोठा दणका! मालाडमधील गोदामाचा अन्न परवाना निलंबित; झुरळे, अस्वच्छता अन् नियमभंग उघड

मुंबई : राज्यभर अन्न सुरक्षेचे नियम मोडणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई सुरू केली

Sourav Ganguly : क्रिकेटच्या ‘दादा’च्या कुटुंबावर संकट? गांगुली दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत तक्रार दाखल

कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ‘दादा’ म्हणून प्रसिद्ध असलेला सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि त्याची