Saturday, April 18, 2026

Mumbai Cricket Team : मुंबई क्रिकेट संघाचा ऐतिहासिक निर्णय; मुंबईचे खेळाडू होणार मालामाल, मिळणार लाखोंचा पगार

Mumbai Cricket Team : मुंबई क्रिकेट संघाचा ऐतिहासिक निर्णय; मुंबईचे खेळाडू होणार मालामाल, मिळणार लाखोंचा पगार

मुंबई :  मुंबईतून अधिकाधिक हिरे भारतीय क्रिकेट संघाला मिळावेत यासाठी मुंबई क्रिकेट संघटनेने हे महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. खेळाडूंना त्यांच्या मेहनतीचा त्यांच्या खेळाचा आता पगार मिळणार असून खेळाडूंचा आर्थिक प्रश्न लवकरात लवकर सुटणार असून त्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल. आता केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंनाच नाही, तर मुंबईच्या देशांतर्गत खेळाडूंनाही 'सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट' म्हणजेच वार्षिक पगार दिला जाणार आहे आणि अशी प्रणाली लागू करणारी मुंबई ही देशातील पहिली राज्य संघटना ठरलीय.

श्रेण्यांनुसार पगार

देशांतर्गत स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंना करारबद्ध करणारी मुंबई ही देशातील पहिली क्रिकेट संघटना आहे. ठरलेल्या श्रेण्यांनुसार अ श्रेणीतील खेळाडूंना १२ ते २० लाख, बी श्रेणीतील खेळाडूंना ८ ते १२ आणि तर क श्रेणीतील खेळाडूंना ६ ते ८ लाख पगार दिला जाणार आहे. विशेष म्हणजे ही रक्कम मॅच फी आणि दैनंदिन भत्त्यांव्यतिरिक्त असणार आहे. म्हणजे मुंबईच्या खेळाडूंना आता आर्थिक विवंचनेशिवाय फक्त खेळावर लक्ष केंद्रित करता येईल.

">मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य नाईक स्पष्टीकरण देत म्हणाले आहे की, " मुंबई क्रिकेटमधील एका नव्या पर्वाला सुरुवात होत आहे. अशी करारबद्ध पद्धत राबवणारी मुंबई ही देशातील पहिली क्रिकेट संघटना आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. या करारामुळे मुलांना चांगले आर्थिक स्थैर्य मिळेल शिवाय मुंबईसाठी अधिक खेळण्याची हिंमतही वाढेल.

या करारामुळे मुंबईच्या खेळाडूंमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे, मुलांनी क्रिकेट संघटनेचे आभार मानले आहे. खेळात आडव्या येणाऱ्या पैशाच्या अडचणी आता लवकरच संपणार असून दडपण दूर होईल आणि खेळाडू आपल्या खेळावर अधिक लक्ष केंद्रित करू शकतील.

अटी आणि शर्थी

खेळाडूंना या करारा चा लाभ घ्यायचा असल्यास पाच निकष पूर्ण करणे हे बंधनकारक असणार आहे.

१. खेळाडू मुंबई संघटनेकडे नोंदणीकृत असणे. २. तंदुरुस्तीचे निकष पूर्ण केलेले असावेत ३. गेल्या दोन मोसमात कोणत्याही आयपीएल संघासह करारबद्ध नसावा. ४. तसेच शिफारशी समितीने निवड करणे आवश्यक आहे ५. भारत अ तसेच कनिष्ठ संघातून काही मोसमात खेळलेल्या खेळाडूंना हा करार लागू नसणार आहे.

भारतासाठी आपल्या खेळातून योगदान देणाऱ्या कितीतरी खेळाडूंची आर्थिक चणचण आता संपणार असून लवकरच नवीन तारे आपल्याला उभारताना दिसणार आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >