Bawankule : काँग्रेसने विरोध करून एससी, एसटी, ओबीसी महिलांचे नेतृत्व झिडकारले !

नागपूर : नारीशक्ती वंदन विधेयकाला काँग्रेसने विरोध करून मतदारसंघांच्या फेररचनेत निर्माण होणारे एससी, एसटी आणि ओबीसी महिलांचे राजकीय प्रतिनिधीत्व झिडकारले आहे. महिलांच्या राजकीय ताकद वाढविण्याच्या ऐतिहासिक प्रगतीला काँग्रेसने खीळ घातली आहे. महिला काँग्रेसला धडा शिकवतील, असा इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. ते माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले,"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताच्या संकल्पासाठी महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. मात्र, काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी या नारीशक्ती वंदन अधिनियम विधेयकाच्या विरोधात मतदान करून आपल्या महिला विरोधी धोरणाचे दर्शन घडवले. ज्या खासदारांनी या विधेयकाविरोधात मतदान केले, त्यांना देशातील आणि राज्यातील महिला आगामी निवडणुकांमध्ये धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत."


पालकमंत्री असल्याने अमरावतीच्या परतवाडा येथील अश्लील व्हिडिओ प्रकरणात सुरू असलेल्या तपासाचा आणि कायदेशीर कारवाईचा मी स्वतः रोज आढावा घेत आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने फॉरेन्सिक आणि डिजिटल प्रणालीचा (अॅडव्हान्स सिस्टीम) वापर करून तपास केला जात आहे. सात मोबाईल जप्त करण्यात आले असून त्यांच्या ऑडिटचा अहवाल येणे बाकी आहे. मुख्यमंत्री स्वतः यावर लक्ष ठेवून आहेत. जोपर्यंत अंतिम पोलीस अहवाल येत नाही, तोपर्यंत कोणीही राजकीय चर्चा किंवा वादग्रस्त वक्तव्ये करू नयेत, जेणेकरून तपासावर दबाव येणार नाही, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.


पाऊस आणि पाणी टंचाईबाबत सरकार सतर्क


सरकार सतर्क असून, प्रशासनाला ५० टक्के पाणी कपातीचे नियोजन आणि सूचना दिल्या आहेत. दुष्काळी परिस्थिती उद्भवू शकते, त्यामुळे सर्वांनी पाण्याचा जपून वापर करणे गरजेचे आहे, असे बावनकुळे म्हणाले. त्यांनी राज्यातील पावसाच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Alert : ऐन पावसाळ्यात महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल; पुढील काही दिवस पावसाला ब्रेक?

मुंबई : ऐन पावसाळ्यात महाराष्ट्राच्या हवामानात पुन्हा मोठा बदल पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील

Pritesh Walia : भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया अमेरिकेत ICEच्या ताब्यातून जामिनावर मुक्त

नवी दिल्ली :  भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया यांची अमेरिकेत ICEच्या ताब्यात तब्बल 14 दिवस राहिल्यानंतर

Jharkhand Students Protest : 24 दिवसांच्या आंदोलनानंतर झारखंड सरकारचा मोठा निर्णय; JSSC-CGL परीक्षा रद्द

झारखंड : झारखंडमध्ये तब्बल 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. मुख्यमंत्री

Bombay High Court on FDA : मुंबई हायकोर्टाचा FDA ला दणका; ५ लाखांचा दंड, कारवाईच्या अतिरेकावर न्यायालयाची नाराजी

मुंबई : महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाला (FDA) मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. पुण्यातील गुरुनानक

DCM Eknath Shinde : 'मराठी भक्तीची भाषा, अमराठी बांधवांनी मराठी स्वीकारून सांस्कृतिक एकात्मतेचा आदर्श घालून दिला'

ठाणे : मराठी ही सक्तीची नव्हे तर भक्तीची भाषा असून, अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी स्वीकारणे ही

Sonia Gandhi : 'वंदे मातरम्' प्रकरणात सोनिया गांधी आणि खर्गेंच्या विरोधात मुंबईत दिंडोशी पोलीस ठाण्यात FIR

मुंबई : स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात 'वंदे मातरम्' गायन सुरू असताना त्यात व्यत्यय