India France Relations : फ्रान्स हा भारताच्या सर्वात विश्वासू आणि मैत्रीपूर्ण भागीदारांपैकी एक - लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

फ्रान्स हा भारताचा सर्वात विश्वासार्ह आणि मैत्रीपूर्ण भागीदारांपैकी एक आहे असे सांगत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दोन्ही देशांमधील खोलवर रुजलेले आणि दीर्घकालीन संबंध अधोरेखित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यातील जिव्हाळ्याच्या वैयक्तिक संबंधांमुळे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत आणि दृढ होण्यास मोठी गती मिळाली आहे, असे त्यांनी नमूद केले. फ्रान्सच्या सिनेटच्या भारत-फ्रान्स आंतर-संसदीय मैत्री गटाच्या शिष्टमंडळाने संसद भवनात बिर्ला यांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी हे विचार व्यक्त केले.


फ्रान्सच्या संसदेत महिलांचे प्रतिनिधित्व ३६ टक्क्यांहून अधिक असल्याबद्दल प्रशंसा करताना बिर्ला यांनी, भारत देखील प्रशासनातील महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी सातत्यपूर्ण वैधानिक आणि संस्थात्मक प्रयत्न करत आहे यावर भर दिला. तळाच्या स्तरापर्यंत , विशेषतः पंचायती राज संस्थांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व अत्यंत उत्साहवर्धक असल्याचे त्यांनी समाधानाने नमूद केले.





बिर्ला यांनी शिष्टमंडळाला पुढे माहिती दिली की, नव्याने बांधलेल्या संसद भवनात संमत करण्यात आलेले पहिले विधेयक 'नारी शक्ती वंदन अधिनियम' हे होते, जे निवडून आलेल्या वैधानिक संस्थांमध्ये महिलांसाठी एक-तृतीयांश आरक्षणाची तरतूद करत आहे. हा ऐतिहासिक कायदा महिला-प्रणीत विकास आणि सर्वसमावेशक प्रशासनाप्रति भारताची ठाम वचनबद्धता दर्शवतो, असे त्यांनी अधोरेखित केले.


भारत आणि फ्रान्स यांच्यातील राजनैतिक आणि संसदीय अशा दोन्ही स्तरांवरील नियमित आणि विधायक संवादाबद्दल बिर्ला यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी गेल्या वर्षी 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारतीय संसदीय शिष्टमंडळाच्या फ्रान्स भेटीची आठवण करून दिली आणि त्या काळात फ्रान्सने दहशतवादाच्या स्पष्ट शब्दांत केलेल्या निषेधाची प्रशंसा केली. त्यांनी फ्रेंच शिष्टमंडळाच्या सदस्यांचा सातत्यपूर्ण पाठिंबा आणि एकजुटीच्या भावनेबद्दल त्यांचे आभार मानले.

Comments
Add Comment

'ATAGS' artillery gun is ready : १५ सेकंदात ३ हल्ले आणि ४८ किमीचा अचूक पल्ला; चीन-अमेरिकाही चकित

नवी दिल्ली: रणांगणावर भारताच्या सं

Delhi-Pune SpiceJet Flight : दिल्ली - पुणे विमानात तांत्रिक बिघाड; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!

नवी दिल्ली : दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याची घटना

Actor Prakash Raj : अभिनेते प्रकाश राज यांचा SIR वरचा दावा खोटा? निवडणूक आयोगाने दाखवला BLOचा व्हिडिओ; म्हणाले "जुन्या पत्त्यावर..."

नवी दिल्ली : अभिनेता प्रकाश राज (Actor Prakash Raj) आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतात. आता कर्नाटकमधील Special Intensive Revision (SIR)

Jharkhand : पोलिसांच्या दडपशाहीविरोधात झारखंड बंद

रांची : झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या

Arunachal Pradesh : "अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग", चीनच्या आक्षेपाला भारताचे चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली : भारताने गेल्या आठवड्यात आपल्या अधिकृत नकाशावर अरुणाचल प्रदेशातील २७ ठिकाणे आणि भौगोलिक

Vande Mataram Law : ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीने ऐतिहासिक विधेयकाचे कायद्यात रूपांतर

नवी दिल्ली: राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’चा अवमान करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी