सातारा : महाराष्ट्रातील गावं आता सुजलाम आणि सुफलाम होण्याच्या दिशेने आपली पाऊले उचलत आहेत. शासनाच्या अनेक योजना गावांच्या विकासाला हातभार लावत असून समृद्ध गाव बनवण्याच्या दिशेने गावांची वाटचाल होत आहे. स्वछ भारत अभियान अंतर्गत महाराष्ट्रातील अनेक गावांनी आपली गावे स्वछ करून शासनाचे पुरस्कार पटकावले आहेत.
त्यातच आता चर्चा आहे महाराष्ट्रातील अशा गावाची ज्याने महाराष्ट्रात पहिल्यांदाच जनावरांसाठी ब्युटी पार्लर उभारले आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे या गावाचं सर्वत्र कौतुक केलं जातंय.
मुंबई : भारतातील अनेक महामार्गांवर टोल वसुली सुलभ करण्यासाठी फास्टॅग चा वापर केला जातो. इंधनाची बचत, वेळेची बचत, आणि पद्धतशीर टोलची वसुलीसुद्धा, याच ...
या गावात आहे महाराष्ट्रातील 'जनावरांचे पहिले ब्युटी पार्लर'
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात प्रसिद्ध असलेली मान्याची वाडी एक आदर्श गाव म्हणून ओळखलं जात. या गावाला देशपातळीवर उत्कृष्ट ग्रामपंचायतीचा सन्मानही मिळाला आहे. आणि याच गावाने आता जनावरांसाठी ब्युटी पार्लर उघडलं आहे.
बाजार समित्यांसाठी राज्य सरकारचे नवे नियम; ५० किलोची मर्यादा बंधनकारक मुंबई : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये राबणाऱ्या माथाडी ...
प्रदूषण रोखण्यासाठीचा उपाय म्हणून...
गावातील जनावरे नदी ओढ्यांमध्ये अंघोळीला जातात, त्यामुळे पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते. यावर उपाय म्हणून एका जनावरांचे ब्युटी पार्लर ही संकल्पना तयार केली गेली. जनावरांच्या अंघोळीसाठी शॉवर पद्धत यात वापरली असून अंघोळीचे पाणी प्रक्रिया करून परसबागेसाठी वापरलं जात, जनावरांनाही स्वच्छ ठिकाणी अंघोळ केल्याने जनावरांचा आरोग्य सुधारत पर्यावरण संरक्षणालाही मोठी चालना मिळत आहे. ग्रामपंचायतीच्या या प्रकल्पाला स्थानिक प्रशासनासह पर्यावरण प्रेमींकडूनही कौतुकाचा वर्षाव होत आहे.






