Marketing Minister Jaykumar Rawal : शालेय अभ्यासक्रमात ‘सहकार’ विषयाचा समावेश होणार

नव्या सहकार धोरणासाठी उच्चस्तरीय समितीची बैठक; आधुनिक तंत्रज्ञान आणि ‘ब्रँडिंग’वर विशेष भर देणार


मुंबई : राज्यातील सहकार क्षेत्र अधिक सक्षम, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी राज्य सरकार सर्वसमावेशक धोरण आखत आहे. सहकाराचा पाया मजबूत करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासोबतच, शालेय स्तरापासून सहकाराची मूल्ये रुजवण्यासाठी अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण विचार शासन स्तरावर सुरू आहे, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी बुधवारी दिली. मुंबईतील राज्य सहकारी बँकेत प्रस्तावित सहकार धोरणासंदर्भात गठित उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते.



या बैठकीला पणन मंत्री जयकुमार रावल, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सहकार आयुक्त दीपक तावरे आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्यासह क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सहकार क्षेत्रातील विविधीकरण आणि युवापिढीचा सहभाग यावर या बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सहकार व्यवस्थापनात पारदर्शकता आणण्यावर भर दिला. सहकारी संस्थांच्या नफ्यातील काही भाग आता 'सीएसआर' अंतर्गत सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी वापरण्याबाबत धोरणात तरतूद केली जाऊ शकते. तसेच सौर ऊर्जा, कचरा व्यवस्थापन आणि फूड पार्क यांसारख्या नव्या क्षेत्रांत सहकारी संस्थांनी पाऊल टाकावे, असे आवाहन त्यांनी केले. ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांचा सक्रिय सहभाग वाढवणे हा नव्या धोरणाचा मुख्य आधार असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.



पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सहकार क्षेत्राच्या 'ब्रँडिंग'वर विशेष भर दिला. "शेतमालाचे मूल्यवर्धन करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पर्धा करण्यासाठी आधुनिकीकरण आवश्यक आहे. शेतमालाचे पॅकेजिंग आणि विपणन यात ग्राहक सहकारी संस्थांची भूमिका महत्त्वाची ठरेल," असे ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील सर्व ग्राहक सहकारी संस्थांचा विशेष मेळावा आयोजित केला जाणार आहे. यामध्ये डिजिटल मार्केटिंग, ई-कॉमर्स आणि पुरवठा साखळी या विषयांवर सविस्तर मंथन होईल.



जिल्हास्तरावर ‘सहकारी व्यवसाय परिसंस्था’ उभारणार


सहकारी उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्हास्तरावर ‘सहकारी व्यवसाय परिसंस्था’ उभारण्याची संकल्पना बैठकीत मांडण्यात आली. राज्यस्तरावर एक स्वतंत्र 'सहकार ब्रँड' निर्माण करणे आणि 'सहकार भवन'च्या माध्यमातून या ब्रँडचे मार्केटिंग मजबूत करण्यावर समिती सदस्यांनी सविस्तर चर्चा केली. सहकार क्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी पुनर्रचना आणि प्रभावी ब्रँडिंग हाच भविष्यातील मार्ग असल्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.

Comments
Add Comment

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे