Pawan Khera : काँग्रेसच्या पवन खेराला आसाम पोलीस अटक करणार ?

नवी दिल्ली : काँग्रेस नेता पवन खेराला आसाम पोलीस अटक करण्याची शक्यता वाढली आहे. काही दिवसांपूर्वी पवन खेराने सोशल मीडिया पोस्ट करून आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीच्या संपत्ती संदर्भात गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी तपास केल्यावर आरोप तथ्यहीन असल्याचे आढळले. या नंतर पवन खेराच्या विरोधात मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीने पवन खेरा विरोधात फेक न्यूजद्वारे बदनामी केल्याचा आरोप करत तक्रार नोंदवली. तसेच मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाला बदनामा करण्याच्या कट कारस्थानात मुख्य भूमिका बजावत असल्याचाही आरोप केला.



मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर तथ्यहीन आरोप करणे भोवणार याची जाणीव होताच पवन खेरा तातडीने दिल्लीहून तेलंगणात जाऊन थांबला. तिथून त्याने ट्रान्झिट जामीनसाठी अर्ज केला. तेलंगणाच्या उच्च न्यायालयाने हा जामीन मंजूर केला. या जामिनाविरोधात आसाम पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण समजून घेतल्यानंतर पवन खेरा यांना गुन्हा आसाममध्ये दाखल झाला असल्यामुळे तिथल्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्याचे निर्देश दिले. तसेच तेलंगणाच्या उच्च न्यायालयाने मंजूर केलेला जामीन रद्द केला.


सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता पवन खेरा याच्यापुढे आसाममध्ये जाऊन न्यायालयात दाद मागणे अथवा आसाम पोलिसांच्या चौकशीला सामोरे जाणे हेच दोन पर्याय उरले आहेत. सध्या पवन खेराकडे अटक टाळणारे कोणतेही संरक्षण कवच नाही. यामुळे पवन खेराला आसाममध्ये पोहोचल्यावर अटक होण्याची दाट शक्यता आहे.



याआधी तेलंगणाच्या उच्च न्यायालयाने पवन खेराला दिलेल्या ट्रान्झिट जामिनाच्या विरोधात आसाम पोलिसांनी महाधिवक्ता तुषार मेहता यांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. घटना आसाममध्ये घडली. गुन्हा आसाममध्ये दाखल झाला. तपास आसाम पोलीस करत आहेत. या परिस्थितीत तेलंगणा उच्च न्यायालयाने अटकपूर्व ट्रान्झिट जामीन का दिला ? हे अधिकारक्षेत्राबाहेर अटकपूर्व जामीन मंजूर करण्याचे प्रकरण आहे; असे मेहता म्हणाले. हा मुद्दा ग्राह्य धरून सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. तेलंगणा उच्च न्यायालयाने दिलेला अटकपूर्व ट्रान्झिट जामीन रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने पवन खेराला आसाममधील न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्याचे निर्देश दिले.

Comments
Add Comment

Divyastra Mk-3 : भारताची आकाशात आणखी एक झेप! ‘दिव्यास्त्र Mk-3’चे यशस्वी उड्डाण; स्वदेशी जेट ड्रोनची ताकद जगासमोर

Divyastra Mk-3 : भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. भारतात विकसित

Prakash Abitkar : गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

गारगोटी येथे रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर उभे करण्याचे नियोजन रुबी हॉल क्लिनिक

WTC : बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवलं; WTC गुणतालिकेत मोठा बदल

डार्विन : बांगलादेशने रविवारी डार्विनच्या मरारा स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान

Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने केला विमानतळावर गोळीबार; २ जण जखमी

वाराणसी : रविवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान एका

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे

Nitesh Rane : आजपासून मुंब्रा नव्हे 'मुंब्रादेवी'च म्हणा!

- मंत्री नितेश राणे यांचे हिंदूंना आवाहन; कोणाच्याही दहशतीला भीक घालू नका मुंबई : "मुंब्रा हे शहर कोणत्याही एका