Goregaon's NESCO Drugs Party : गोरेगावच्या नेस्कोतील ड्रग पार्टीचा मास्टरमाइंड अखेर पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : मुंबईच्या गोरेगाव मधील नेस्को येथे एक्सझिबिशन सेंटरमध्ये एका 'लेट नाईट टेक्नो म्युझिक' कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मोठ्या प्रमाणात तरुणाई लोटली होती. यातील बऱ्याच तरुणांनी ड्रग्सचे, अमली पदार्थांचे सेवन केले होते. याच अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे दोन एमबीएच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर एकाची प्रकृती गंभीर आहे.


ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे मृत्यु झाला आणि पर्दाफाश झाला ड्रग्सच्या मोठ्या रॅकेटचा, कल्याणमधून आरोपीला अटक करण्यात आली. यातून पोलिसांची कसरत पणाला लागली आणि एक फिल्मी स्टाईल हायवोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.



पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली आणि सुरुवातीला पोलिसांचा ताफा कल्याणमधील 'मोहन हाइट्स' या इमारतीत गेला. घरात शिरताच एक माणूस समोर आला, त्याला आनंद पटेल या इसमाबद्दल विचारले असता, त्याने उत्तर द्यायला टाळाटाळ केली, समोर आलेली व्यक्ती आनंद पटेलचा वडील लखन पटेल होता म्हणून तो मुलाला वाचवण्यासाठी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता. जवळपास पोलिसांना तासभर बाहेर ताटकळत ठेवले आणि पोलिसांनीही आनंद बाहेर येत नाही तोपर्यंत इथून आम्ही हलणार नाही अशी थेट थंबी दिली.


पोलिसांच्या दबावात शेवटी घराचा दरवाजा उघडला गेला आणि आनंद पोलिसांच्या ताब्यात आला. स्वतःला व्यावसायिक म्हणवून घेणारा आनंद पटेल आणि लेखन पटेल यांच्यावर आधी अनेक आर्थिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तसेच नेस्को पार्टीतील आयोजकांना ड्रग्स पुरवण्यात आनंदची महत्वाची भूमिका होती.



वनराई पोलिसांनी कठोर पाऊले उचलत कार्यक्रमाचे आयोजक, नेस्कोचे कर्मचारी आणि मृतांच्या दोन मित्रांसह इतर पाच संशयितांना अटक केली आहे. हा तपास आणखी किती खोलवर जातो? आणखी किती चेहरे समोर येतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

Mumbai Update : मुंबईत मलेरियाचा वाढता धोका; 3,177 रुग्णांची नोंद, डेंग्यू-लेप्टोमध्ये मात्र घट

Mumbai : मुंबईत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने उपाययोजना तीव्र

Mumbai Navy Nagar News : नौदल जवान, पत्नी अन् दोन चिमुकल्यांचा संशयास्पद मृत्यू; मुंबईतील 'नेव्ही नगर'मध्ये धक्कादायक घटना

राजस्थान : राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील ककराना गावातील रहिवासी आणि भारतीय नौदलात कार्यरत असलेले जवान

Jalgaon News : ग्रामसभेत गोंधळ, शिवीगाळ अन्...; ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Jalgaon Crime News: जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे येथे एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. ग्रामसभेत (Gram Sabha) झालेला

Maha Walkathon 2026 : महा वॉकेथॉन 2026 मध्ये अभिनेता संजय दत्त यांचा सहभाग; 36 जिल्ह्यांत ‘वॉक फॉर वॉटर’

मुंबई : माती आणि जलसंधारणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण

Rishabh Pant New Record : षटकारांचं शतक तेही सर्वात जलद! रिषभ पंतने रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय

गॉल : भारताचा स्टार विकेटकीपर-बॅटर रिषभ पंतने (Rishabh Pant) श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात इतिहास

Sunny Deol : सनी देओलच्या ‘बटवारा १९४७’ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; विकेंडला केली जोरदार कमाई, २३ चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले!

सनी देओल (Sunny Deol) आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांचा ‘बंटवारा १९४७’ (Batwara 1947) हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी