Mumbai Update : मुंबईत मलेरियाचा वाढता धोका; 3,177 रुग्णांची नोंद, डेंग्यू-लेप्टोमध्ये मात्र घट

Mumbai : मुंबईत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने उपाययोजना तीव्र केल्या आहेत. 1 जून ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत मुंबईत मलेरियाचे 3,177 रुग्ण आढळले आहेत. मागील वर्षी याच कालावधीत 2,852 रुग्णांची नोंद झाली होती. म्हणजेच यंदा मलेरियाच्या रुग्णसंख्येत सुमारे 11.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे.



दुसरीकडे, डेंग्यूच्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. यंदा 1,079 रुग्ण आढळले, तर मागील वर्षी ही संख्या 1,217 होती. तसेच लेप्टोस्पायरोसिसचे 189 रुग्ण नोंदले गेले असून, मागील वर्षी 322 रुग्ण होते. त्यामुळे डेंग्यू आणि लेप्टोच्या तुलनेत यंदा घट दिसत असली, तरी पावसाळ्यात साचलेले पाणी आणि डासांची उत्पत्ती यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, 1 ते 15 ऑगस्टदरम्यान BMC ने 5 लाख 63 हजार 382 घरांचे सर्वेक्षण केले. या मोहिमेत 26 लाख 85 हजार 828 नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, 32 हजार 158 रक्तनमुने संकलित करण्यात आले. लेप्टोस्पायरोसिसपासून बचावासाठी 24 आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आणि 10,542 नागरिकांना प्रतिबंधात्मक उपचार देण्यात आले. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठीही महापालिकेने मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे. छतांवर आणि परिसरात आढळलेले 674 टायर आणि 25,860 भंगार वस्तू हटवण्यात आल्या आहेत. तसेच 18,568 इमारतींच्या परिसरात आणि 3 लाख 18 हजार 803 झोपड्यांमध्ये धूम्रफवारणी करण्यात आली.



याशिवाय, डेंग्यूच्या प्रसाराला कारणीभूत ठरणाऱ्या Aedes डासांची 11,227 उत्पत्तीस्थाने आढळल्याची माहिती समोर आली आहे. BMC च्या Insecticide Department कडून मलेरिया, डेंग्यू आणि इतर vector-borne diseases च्या नियंत्रणासाठी अळीनाशक उपाय आणि फॉगिंग केले जाते. या आकडेवारीत आणखी एक चिंताजनक बाब समोर आली आहे. H1N1 रुग्णसंख्या 72 वरून 309 वर पोहोचली असून सुमारे 329.2 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पावसाळ्यात ताप, अंगदुखी, थंडी वाजणे किंवा इतर लक्षणे जाणवल्यास दुर्लक्ष न करता वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Mumbai Navy Nagar News : नौदल जवान, पत्नी अन् दोन चिमुकल्यांचा संशयास्पद मृत्यू; मुंबईतील 'नेव्ही नगर'मध्ये धक्कादायक घटना

राजस्थान : राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील ककराना गावातील रहिवासी आणि भारतीय नौदलात कार्यरत असलेले जवान

Maha Walkathon 2026 : महा वॉकेथॉन 2026 मध्ये अभिनेता संजय दत्त यांचा सहभाग; 36 जिल्ह्यांत ‘वॉक फॉर वॉटर’

मुंबई : माती आणि जलसंधारणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण

Devendra Fadnavis : दोन वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सिंगापूर आणि 'यूएई'ला मागे टाकेल

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास; अमेरिकेतील कंपन्यांकडून गुंतवणुकीचा ओघ वाढणार मुंबई : "राज्याचा

Sameer Wankhede on FDA Raids : तुकाराम मुंढे फार काही वेगळं करतायत असं नाहीये...तुकाराम मुंढेंबाबतच्या प्रश्नावर समीर वानखेडेंचे थेट उत्तर!

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे (NCB) माजी विभागीय संचालक आणि चर्चित आयआरएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आपल्या रोखठोक

Accident News : मिरा रोडमध्ये भरधाव वाहनाने नागरिकांना उडवलं; धडकेनंतर चालक फरार, व्हिडिओ व्हायरल

मिरा रोड:  मिरा-भाईंदर येथे भरधाव आणि बेदरकार वाहनचालकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिरा रोड येथील जे.पी.

Bhandup News : आधी बाबा गेले, आता आईची साथ सुटली; मुलीने मुखाग्नी देत निभावले अंतिम कर्तव्य, भांडुपवासीयांचे डोळे पाणावले

रत्नागिरी : नियतीचा खेळ अथांग आणि अतिशय निष्ठूर असतो, याचाच प्रत्यय आणून देणारी एक दुःखद घटना मुंबईतील भांडुप