Samrat Choudhary : भाजपचे सम्राट चौधरी होणार बिहारचे नवे मुख्यमंत्री, घोषणेआधी काय घडलं ? जाणून घ्या सगळं

पाटणा : जवळपास दोन दशकं बिहारचे नेतृत्व केल्यानंतर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. आता ते जेडीयूचे राज्यसभा खासदार म्हणून काम करणार आहेत. एनडीएतील एक महत्त्वाचे नेत म्हणून ते दिल्लीत मोठी भूमिका बजावण्याची शक्यता आहे. नितीश यांनी राजीनामा दिल्यानंतर एनडीएतील अंतर्गत सामंजस्यानुसार बिहारमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीने नव्या मुख्यमंत्र्यांची नावाची घोषणा केली आहे. नितीश सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहिलेल्या सम्राट चौधरींची एकमताने बिहारच्या मुख्यमंत्रि‍पदासाठी निवड झाली आहे. नितीश कुमार यांनी सम्राट यांच्या नेतृत्वातील बिहार सरकारला पाठिंबा दिल्याचे तसेच दिल्लीत राज्यसभा खासदार म्हणून काम करताना बिहारच्या विकासाला गती देण्यासाठी शक्य ते ते करणार असल्याचे जाहीर केले आहे.



बिहारमध्ये एकविसाव्या शतकातही जातीपातींच्या राजकारणाला प्रचंड महत्त्व आहे. सम्राट चौधरी हे कुशवाह (कोईरी) या ओबीसींमध्ये समाविष्ट असलेल्या समाजाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीची मूळं बिहारमध्ये आणखी मजबूत होतील, असे राजकीय अभ्यासकांचे मत आहे. नितीश कुमार हे कुर्मी समाजाचे होते, त्यामुळे सम्राट चौधरींना मुख्यमंत्री करून भाजपने 'लव-कुश समीकरण' साधले आहे. बिहारच्या राजकारणात कुर्मी आणि कोईरींमधील राजकीय सामंजस्याला 'लव-कुश समीकरण' म्हणतात. हे समीकरण साधून भाजपच्या नेतृत्वात एनडीएने स्वतःची मतपेढी अर्थात व्होटबँक आणखी मजबूत केली असल्याचे मत राजकीय अभ्यासक व्यक्त करत आहेत.



सम्राट चौधरी हे २०२३ मध्ये बिहार भाजपचे अध्यक्ष झाले. नंतर बिहारच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे नेतृत्व सम्राट यांनीच केले. नितीश सरकारमध्ये ते भाजपचे राज्यातील सर्वोच्च नेते म्हणून उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री झाले. आता ते बिहारचे मुख्यमंत्री होत आहेत. सम्राट चौधरी बुधवार १५ एप्रिल २०२६ रोजी बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचे वृत्त आहे. राज्यपाल सम्राट यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देणार असल्याचे समजते.

Comments
Add Comment

Amit Shah : ' तुमचे हे पाप देशातील जनता कधीच माफ करणार नाही'

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात (इंदिरा भवन) स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमादरम्यान

Kiren Rijiju : "विरोधी नेत्यांना 'दिमागी नक्षलवादी' म्हटले नाही"

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातील 'दिमागी नक्षलवादी'

Nashik Firing : नाशिकमध्ये पानटपरीवर उभ्या असलेल्या तरुणावर गोळीबार

नाशिक : अध्यात्मिक शहर अशी ओळख मिरवणाऱ्या नाशिकमध्ये रविवारी गोळीबाराची घटना घडली. नाशिक रोडच्या गोसावी

Sunetra Pawar : 'दादांचे प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राचे स्वप्न सर्वांच्या साथीने पूर्ण करायचे आहे'

पुणे : दादांनी (अजित पवार) तुम्हाला आणि मला दिलेला हा जो विकासाचा वारसा आहे तो वारसा अर्ध्यावर सोडून देणे हे

Meghna Sakore Bordikar : 'परभणी गुंतवणूक परिषदेतून १,६०० कोटींची गुंतवणूक; स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी'

परभणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात परभणी जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण निर्माण

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना