IPL 2026 MI vs RCB : वानखेडेवर RCBचा जल्लोष तर मुंबई इंडियन्सने केली पराभवाची 'हॅट्रिक'

मुंबई : RCB ने वानखेडेच्या ऐतिहासिक मैदानावर दमदार खेळ करत Mumbai Indians ला १८ धावांनी पराभूत केले. या पराभवामुळे मुंबई इंडियन्सच्या नावावर सलग तिसरा पराभव नोंदवला गेला असून संघाची स्थिती पॉईंट टेबलमध्ये खालावली आहे. कर्णधार हार्दिक पंड्या Hardik Pandya याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र आरसीबीच्या फलंदाजांनी तो पूर्णपणे चुकीचा ठरवला.


आरसीबीकडून फील सॉल्ट (Phil Salt) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी तुफानी सुरुवात केली. पॉवरप्लेमध्ये दोघांनी ७१ धावा केल्या आणि १० षटकांत ११५ धावांची भागीदारी उभारली. सॉल्टने ३६ चेंडूत ७८ धावांची आक्रमक खेळी करत मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई केली. तर कोहलीने ३८ चेंडूत ५० धावा करत संयमी अर्धशतक झळकावले.



यानंतर कर्णधार रजत पाटीदारने मैदानात येताच चौकार-षटकारांची आतषबाजी केली. त्याने केवळ २० चेंडूत ५३ धावा करत डावाला वेग दिला. शेवटी टीम डेव्हिडने १६ चेंडूत नाबाद ३४ धावा करत आरसीबीला २४२ धावांपर्यंत पोहोचवले.


२४२ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात चांगली झाली. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रयान रिकेल्टन यांनी संघाला गती दिली, मात्र रोहित दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव (Suyash Sharma) याने सलग धक्के देत सामना आरसीबीकडे झुकवला.


सूर्या (३३), हार्दिक पांड्या (४०) यांनी प्रयत्न केले, पण आरसीबीच्या गोलंदाजीसमोर मुंबईचा डाव २२२ धावांवरच थांबला. त्यामुळे मुंबईला १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

Comments
Add Comment

बटलर - गिलमुळे गुजरातचा सलग दुसरा विजय, लखनौने गुजरातच्या गोलंदाजीपुढे गुडघे टेकले

लखनौ : इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत गुजरात टायटन्सने रविवारी लखनौ सुपर जायंट्सला त्यांच्या घरच्या मैदानात

राजस्थान रॉयल्सच्या मॅनेजरची BCCI करणार चौकशी

गुवाहाटी : राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात शुक्रवार १० एप्रिल रोजी झालेला सामना राजस्थानने

IPL 2026 CSK vs DC : अखेर चेन्नईच्या विजयाचा श्रीगणेशा झालाच! संजू सॅमसन ठरला या हंगामातील पहिला शतकवीर

चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२६ मधील १८व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने

IPL 2026 MI vs RCB : मुंबई इंडियन्स बंगळुरु रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध जोरदार पुनरागमन करणार ?

मुंबई : आयपीएलच्या १९ व्या हंगामात पुन्हा एकदा संथ सुरुवात झाल्यानंतर, मुंबई इंडियन्स आता आपल्या परिचित आणि

IPL 2026 Points Table : १५ सामन्यांनंतर राजस्थान रॉयल्स टॉपवर; हे ४ संघ प्लेऑफच्या रेसमध्ये आघाडीवर

मुंबई : आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत १५ सामने पूर्ण झाले असून स्पर्धा आता रंगात आली आहे. काही संघ जबरदस्त

IPL 2026 Wanindu Hasaranga : लखनऊची डोकेदुखी वाढली! स्टार स्पिनर हसरंगा उर्वरित स्पर्धेतून बाहेर

श्रीलंकेचा लेगस्पिनर वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) दुखापतीमुळे चालू आयपीएल हंगामातून बाहेर पडला आहे. त्याच्या