Maharashtra : उदंचन जलविद्युत प्रकल्पाद्वारे ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्र अग्रेसर ठरणार

मुंबई : राज्यातील वीज निर्मितीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार येत उदंचन जलविद्युत प्रकल्पातून एक लाख मेगावॅट वीज क्षमता निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्र हे उदंचन जलविद्युत प्रकल्प (पीएसपी) माध्यमातून सर्वात जास्त ऊर्जा निर्मितीची क्षमता असणारे राज्य ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. आज मंत्रालयात मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या उपस्थितीत उदंचन जलऊर्जा क्षेत्रातील १२०० मेगावॅट वीज निर्मितीसाठी जलसंपदा विभाग व नोव्हॅरियन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड समवेत सामंजस्य करार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशी, जलसंपदा (लाभक्षेत्र विकास) सचिव संजय बेलसरे, नोव्हॅरियन एनर्जीचे अरुण लखानी, सारंग लखानी तसेच जलसंपदा व ऊर्जा विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


विविध करारांद्वारे आत्तापर्यंत राज्यात एकूण 78218 मेगावॅट वीज निर्मिती क्षमतेची वाढ होणार असून यासाठी चार लाख २२ हजार ४६१ कोटी रुपयांची गुंतवणूक आणि एक लाख २७ हजार रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे. विशेषतः अक्षय ऊर्जेच्या प्रकल्पांना प्राधान्य देत राज्य ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करत आहे. यामुळे औद्योगिक विकासाला गती मिळणार असून पर्यावरणपूरक आणि शाश्वत ऊर्जा निर्मितीला चालना मिळणार आहे. राज्य शासनाने आत्तापर्यंत ऊर्जा निर्मितीसाठी विविध कंपन्यांसोबत ऊर्जा क्षेत्रात ५५ सामंजस्य केले आहेत. या करारांमध्ये टाटा पॉवर कंपनी, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, अदानी ग्रीन एनर्जी, टोरेंट पॉवर लिमिटेड यासह विविध उद्योग समूहांचा समावेश असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


सामंजस्य कराराची वैशिष्ट्ये :-




  1. उदंचन जलविद्युत निर्मिती क्षेत्रातील ५६ वा सामंजस्य करार

  2. या प्रकल्पद्वारे १२०० मेगावॅट वीज निर्मिती; या प्रकल्पासाठी सुमारे ₹५,७६० कोटींची गुंतवणूक; यामधून सुमारे १,५०० रोजगारनिर्मिती

  3. या कराराअंतर्गत नोव्हॅरियन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून रानवाडी ता. महाड जि. रायगड येथे प्रकल्प उभारणी होणार

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : पोलीस ठाण्यांची ‘अ’, ‘ब’, ‘क’ वर्गवारी करणार

मुंबई : वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेऊन

Pratap Sarnaik : गणेशोत्सवात स्वस्तात एसटीने गावी जाता येणार

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एसटी बसच्या एकेरी गट आरक्षणावर

Vishakha Raut : माजी महापौर विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद धोक्यात जात प्रमाणपत्र ठरवले आहेत

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : माहीम येथील प्रभाग क्रमांक १९१ मधून निवडून आलेल्या उबाटाच्या नगरसेविका माजी महापौर

Private Coaching Center : खासगी शिकवणी केंद्रांच्या नियमनासाठी कायद्याच्या प्रारूप मसुद्यावर ४ सप्टेंबरपर्यंत सूचना-हरकती पाठविण्याचे आवाहन

मुंबई : राज्यातील खासगी शिकवणी केंद्रांच्या नोंदणी व नियमनासाठी स्वतंत्र कायदा करण्याच्या दृष्टीने शासनाने

Mega Block : रविवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; लोकल सेवांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता

Mumbai : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी येत्या रविवारी, दिनांक

Traffic and Power Block : दिवा स्थानकावर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक; कल्याण दिशेकडील पादचारी पुलाच्या कामामुळे लोकल सेवांवर परिणाम

Mumbai : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून दिवा स्थानकावर पायाभूत सुवि