महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत पर्यटनाची मोठी क्षमता, सामर्थ्य आहे. पर्यटक आकर्षित व्हावेत, पर्यटनाला चालना मिळावी, यादृष्टीने महानगरपालिका विविध पावले उचलत आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सहकार्याने आणि समन्वयाने त्यात आणखी सुधारणा करण्यात येईल. मुंबईत आणखी पर्यटन स्थळे विकसित करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्यात येईल. पर्यटक, नागरिकांना विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने समर्पित संकेतस्थळ विकसित करावे, अशा सूचना महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी महामंडाळाला केल्या. ( Brihanmumbai Municipal Corporation)
बृहन्मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि मुंबई शहर जिल्हाधिकारी यांची 'मुंबई पर्यटन' या विषयावर संयुक्त बैठक शुक्रवारी ३१ जुलै २०२६ रोजी महानगरपालिका मुख्यालयात पार पडली. त्यावेळी महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी (मुंबई शहर जिल्हा) आंचल गोयल, अपर जिल्हाधिकारी बाप्पासाहेब थोरात, महानगरपालिका उपायुक्त (आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी संजयकुमार शिंदे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल, व्यवसाय विकास विभागाच्या प्रमुख मानसी कोठारे, आदी उपस्थित होते. प्रारंभी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे मुंबई पर्यटन याविषयाी माहिती सांगितली. ( Municipal Corporation)
महापालिकेच्या वतीने भायखळ्यातील कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले गौरवोद्गार मुंबई (विशेष प्रतिनिधी) : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी ...
मुंबई हे देश - विदेशातील पर्यटकांसाठी महत्त्वाचे पर्यटन केंद्र आहे. मुंबईतील विविध पर्यटनस्थळांवर स्वच्छता, सुशोभीकरण, सुरक्षितता, मार्गदर्शक फलक, सार्वजनिक स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच डिजिटल माहिती प्रणाली यांसारख्या दर्जेदार आणि सर्वसमावेशक सुविधा उपलब्ध करून देण्यावर महानगरपालिकेचा विशेष भर आहे. मुंबई महानगराचा सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि वारसास्थळांचा ठेवा पर्यटकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मुंबईची पर्यटन क्षमता अधिक वृद्धिंगत होऊन नागरिकांसह देश-विदेशातील पर्यटकांना अधिक दर्जेदार आणि समाधानकारक अनुभव मिळावा, असा मुंबई महानगरपालिकेचा प्रयत्न आहे, असे महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले. पर्यटक मार्गदर्शन आणि सोयी-सुविधांच्या अनुषंगाने आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, अशी ग्वाहीदेखील आयुक्त भिडे यांनी दिली. (Maharashtra Tourism)
जुन्या कंपन्यांवर प्रशासनाची मेहेरनजर.. कंत्राट संपून वर्ष उलटले तरीही नवीन नाही टेंडरचा नाही पत्ता मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका शालेय ...
मुंबईकरांना मुलभूत सेवासुविधा पुरविणे हे महानगरपालिकेचे आद्य कर्तव्य आहे. त्याचबरोबर पर्यटनविषयक अनुषंगिक कामे, पर्यटन प्रचारदेखील महानगरपालिकेमार्फत केला जात आहे,असेही आश्विनी भिडे यांनी सांगितले.महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल म्हणाले की, राज्यातील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि विकासासाठी महाराष्ट्र शासन समर्पित आहे. पर्यटन पायाभूत सुविधा वाढवणे, धोरणात्मक योजना तयार करणे आणि शाश्वत पर्यटन उपक्रम राबविणे हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. मुंबईसारख्या गजबजलेल्या महानगरास पर्यटन स्थळांचा समृद्ध वारसा आहे. इको - टुरिझम, साहसी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था विशेषत: महानगरपालिकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. त्याची सुरूवात मुंबई महानगरपालिकेकडून व्हावी. मुंबई महानगरपालिकेने याकामी सकारात्मक सहकार्य करावे, असे आवाहन जैस्वाल यांनी केले आहे.