Asha Bhosle : ज्येष्ठ गायिका आशा भोसले अनंतात विलीन, मान्यवर आणि चाहत्यांनी घेतले अखेरचे दर्शन

मुंबई : ज्येष्ठ पार्श्वगायिका, पद्मविभूषण तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित आशा भोसले यांचे १२ एप्रिल २०२६ रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दादर येथील कै.भागोजी कीर हिंदू स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दलातर्फे बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.


दिवंगत आशा भोसले यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, मंत्री ॲड.आशिष शेलार, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री भरतशेठ गोगावले, मंत्री संजय शिरसाट, मुंबई महानगरपालिका महापौर रितू तावडे, खासदार अनिल देसाई, आमदार रविंद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार महेश सावंत, मुंबई महानगर पालिका उपमहापौर संजय घाडी, मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर, कलावंत, चाहते तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी अखेरचे दर्शन घेत पुष्पचक्र वाहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तत्पूर्वी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून पाठविण्यात आलेले पुष्पचक्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत आशा भोसले यांच्या पार्थिवावर अर्पण केले.


सोमवारी सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० या वेळेत दिवंगत आशा भोसले यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार प्रणिती शिंदे, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार अरविंद सावंत, आमदार आदित्य ठाकरे, आमदार भाई जगताप, आमदार सुनील शिंदे, आमदार मिलिंद नार्वेकर विविध क्षेत्रातील मान्यवर, कलावंत तसेच चाहत्यांनी त्यांचे अखेरचे दर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली.

Comments
Add Comment

Reservation : अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत निवेदन देण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने निवेदन किंवा अर्ज सादर करण्यासाठी

Nitesh Rane : मत्स्य शेतकऱ्यांच्या उत्पादनांसाठी राज्यात 'क्लस्टर', मूल्यवर्धनासाठी कारखाना उभारण्यावरही चर्चा

मुंबई : राज्यातील मत्स्यव्यवसायाला आधुनिक उद्योगाची जोड देण्यासाठी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे

Asha Bhosle : आज स्वर शांत झाले, स्वर समाधी; सूर सम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन

मुंबई : अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि आशा ताईंना शनिवारी तात्काळ मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात

Maharashtra's Energy Capacity : महाराष्ट्राची ऊर्जा क्षमता वाढणार

 पहिल्या कोळसा रेल्वे रॅकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत मुंबई : राज्याच्या ऊर्जा

Minister Pankaja Munde : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत शेतकरी गट व वराह पालनाचा समावेश - पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

मुंबई : राज्यात पशुधनावर आधारित उद्योजकता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना घोषित

Nashik Housing Scam : नाशिकमधील गृहनिर्माण घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी

 विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश मुंबई :