Sunetra Pawar : राष्ट्रवादीतील नव्या दमाच्या लोकांना पुढे आणणार, सुनेत्रा पवारांची घोषणा

'कार्यकर्त्याला विश्वासात घेऊनच पुढील दिशा ठरविणार'


बारामती : आगामी काळात विकासकामे आणि संघटनात्मक बांधणी करताना प्रत्येक कार्यकर्त्याला विश्वासात घेऊनच पुढील दिशा ठरविली जाईल. कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्या उचलायच्या नाहीत, या भावनेला पूर्णविराम देत प्रत्येकाला सन्मान दिला जाईल. नव्या दमाच्या सक्षम लोकांना पुढे आणण्यासाठी ठोस निर्णय घेऊन त्यांना कामाची संधी उपलब्ध करून दिली जाईल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची आगामी रणनीती स्पष्ट केली. कन्हेरी येथे मारुती रायाचे दर्शन घेऊन बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ नारळ फोडून करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, बारामतीची पोटनिवडणूक ही ऐतिहासिक जबाबदारी आहे. ती माझ्यासह बारामतीकरांवर देखील आहे. दोन महिन्यांपूर्वी नियतीचा क्रूर खेळ झाला. दादा आपल्याला सोडून गेले, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अलोट जनसागर लोटला.


यावेळी संपूर्ण देशाला दादा काय चीज होते ते समजले. दादांच्या विमान अपघातात विखुरलेले कागदपत्रे त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत असणाऱ्या कार्यमग्नतेचीच साक्ष दिली. दादांनंतर मी घेतलेली जबाबदारी महिला म्हणून पार पाडू शकेल का, असा संशय अनेकांना होता. मात्र, ‘दादां’च्या आशीर्वाद रुपाने ही जनता माझ्यामागे उभी राहिली, मला लढण्याचे बळ दिले. राज्याला पहिले महिला धोरण देणाऱ्या परिवाराची मी सून आहे. महिला म्हणून कोणीही माझ्या कामाचे मूल्यांकन करू नये, असे मला वाटते. दादांच्या निधनानंतर तालुक्यातील यात्रा, जत्रा, उरुस अत्यंत साधेपणाने साजरे झाले. त्यामुळे बारामतीकरांचे नेत्यांविषयी असणारे अपार प्रेम, श्रद्धा दिसून आले. बारामतीकरांच्या या विश्वासाला पात्र राहून ‘दादां’च्या स्वप्नातील बारामती घडविण्यासाठी पूर्ण ताकतीने काम करेन, अशी ग्वाही देते, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या. यावेळी भाषण करताना अजितदादांच्या आठवणींनी मंत्री आदिती तटकरे यांचे डोळे पाणावले. यावेळी आमदार सुनील शेळके, दिलीप वळसे पाटील, सना मलिक, विश्वास देवकाते, भाजपचे अविनाश मोटे आदींची भाषणे झाली. यावेळी जय पवार, रुतुजा पवार, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार शंकर मांडेकर, पृथ्वीराज जाचक, वीरधवल जगदाळे, दिगंबर दुर्गाडे, सचिन सातव, किरण गुजर आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

बटलर - गिलमुळे गुजरातचा सलग दुसरा विजय, लखनौने गुजरातच्या गोलंदाजीपुढे गुडघे टेकले

लखनौ : इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत गुजरात टायटन्सने रविवारी लखनौ सुपर जायंट्सला त्यांच्या घरच्या मैदानात

Ashok Kharat Case : चिंचोक्यांपासून खडे बनवणारा व्यावसायिक एसआयटीच्या रडारवर

नाशिक : बाजारात सुमारे १०० रुपये किलो दराने मिळणाऱ्या चिंचोक्यांपासून आकर्षक खडे तयार करून ते ‘मंत्रबद्ध’

मागाठाणे–गोरेगाव १२० फूट डी.पी. रोड प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन

मुंबई : लोखंडवाला–मागाठाणे १२० फूट डी.पी. रोड या प्रकल्पाचे भूमिपूजन रविवार १२ एप्रिल रोजी कांदिवली पूर्व येथील

Asha Bhosle : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या पार्थिवाचे दर्शन

मुंबई : ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचे आज

Shiv Sena : पंढरपूरमध्ये शिवसेनेच्या ताकदीत वाढ; भगीरथ भालके, डॉ. प्रणिता भालके आणि आमदार तानाजी सावंतांचा पुतण्या शिवसेनेत

पंढरपूर : “विकासाचा वारकरी आणि धाडसी निर्णय घेणारा जननेता” अशी ओळख अधिक ठळक करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी

Nari Shakti Vandan Sammelan : पंतप्रधान नरेंद्र मोदी नारी शक्ती वंदन संमेलनाच्या माध्यमातून कर्तृत्ववान महिलांशी संवाद साधणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नारी शक्ती वंदन संमेलनाच्या