Asha Bhosle : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या पार्थिवाचे दर्शन

मुंबई : ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचे आज मुंबईतील बीच कँडी रुग्णालय येथे निधन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्या राहत्या घरी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले व भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, आमदार सुनील शिंदे, आमदार प्रसाद लाड यांनीही श्रद्धांजली अर्पण केली. सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या पार्थिवावर उद्या, दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती मंत्री ॲड.शेलार यांनी दिली.


ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या पार्थिवाचे सोमवार १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत कासा ग्रँडे को-ऑप. हाऊसिंग सोसायटी, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई येथे कुटुंबातील सदस्यांना आणि मान्यवरांना अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यानंतर दुपारी चार वाजता दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत (कै. भागोजी कीर हिंदू स्मशानभूमी, प. पू. जांभेकर महाराज पथ, शिवाजी पार्क, दादर, मुंबई) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Comments
Add Comment

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

Instagramचा १० वर्षांनंतर वर्डमार्क बदलला; ‘Instagzam’ म्हणत युजर्सची खिल्ली, तुम्हाला नवीन डिझाइन कसं वाटलं?

मुंबई : जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने जवळपास १० वर्षांनंतर आपल्या ब्रँडच्या लिखित ओळखीत

सिगारेटच्या पाकिटावर लिहिलं देशभक्तीचं अमर गीत! लतादीदींनी सुरुवातीला दिला होता नकार; ‘ऐ मेरे वतन के लोगों’ची कहाणी थक्क करणारी

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीच्या गाण्यांनी संपूर्ण देशाचं वातावरण भारून जातं. मात्र, ‘ऐ मेरे वतन के

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Dilip Kumar : ७८ वर्षांपूर्वी गाजलेलं बॉलिवूडचं देशभक्तीपर गाणं! मोहम्मद रफींचा आवाज, दिलीप कुमार यांच्यामुळे अजरामर झालेला इतिहास

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीपर गाण्यांनी वातावरण भारून जातं. ‘ऐ मेरे वतन के लोगों’, ‘मेरे देश की

Swara Bhasker News : स्वरा भास्करचा ट्रोलर्सवर जोरदार हल्लाबोल! 'त्या' एका वाक्याने बंद केली नेटकऱ्यांची बोलती

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. फहाद अहमद यांच्याशी