Nari Shakti Vandan Sammelan : पंतप्रधान नरेंद्र मोदी नारी शक्ती वंदन संमेलनाच्या माध्यमातून कर्तृत्ववान महिलांशी संवाद साधणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नारी शक्ती वंदन संमेलनाच्या माध्यमातून देशातील लोकप्रिय तसेच कर्तृत्ववान महिलांशी विज्ञान भवन येथे संवाद साधणार आहेत. भारताला २०४७ पर्यंत विकसित करण्यासाठी महिलांच्या नेतृत्वात करायच्या कामांविषयी चर्चा करणार आहेत. देशाच्या विकास कार्यक्रमात महिलांचा अधिकाधिक सहभाग असावा याच विचारातून पंतप्रधान मोदी लोकप्रिय तसेच कर्तृत्ववान महिलांशी संवाद साधणार आहेत. नारी शक्ती वंदन संमेलनात प्रशासन, शिक्षण, विज्ञान, क्रीडा, उद्योजकता, प्रसारमाध्यमे, समाजसेवा, संस्कृती अशा विविध क्षेत्रांतील लोकप्रिय तसेच कर्तृत्ववान महिला सहभागी होणार आहेत.


देशाच्या संसदेने सप्टेंबर २०२३ मध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम हे विधेयक मंजूर केले. हे करताना महिलांचे आरक्षण नवीन जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेशी जोडले होते. कोरोना संकटामुळे जनगणनेला विलंब झाल्याने २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार देशात महिला आरक्षण लागू करण्यासाठी गुरुवार ते शनिवार, १६ ते १८ एप्रिल २०२६ या कालावधीत संसदेच्या विशेष अधिवेशनात नवे विधेयक सादर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नारी शक्ती वंदन संमेलन होणार आहे.


भारताच्या विकास कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी तसेच या कार्यक्रमातील महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. ग्रामीण प्रशासन व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पंचायतींपासून ते देशाच्या संसदेपर्यंत सर्व पातळ्यांवर प्रशासन आणि नेतृत्वामध्ये महिलांची भूमिका महत्त्वाची आहे. देशाच्या निर्णय प्रक्रियेत महिलांचे प्रतिनिधित्व वाढवणे आवश्यक आहे, अशी केंद्र सरकारची भूमिका आहे. सरकारची ही भूमिका आणि त्यामागील कारणं समजावून सांगण्यासाठी नारी शक्ती वंदन संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Chamoli tunnel tragedy : ७ कामगारांचा मृत्यू; ३ अद्याप बेपत्ता, बचावकार्य युद्धपातळीवर

चमोली : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील पीपलकोटी परिसरात THDCच्या जलविद्युत प्रकल्पाच्या निर्माणाधीन बोगद्यात

Air India Safety : हवाई प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्या, केंद्र सरकारचे एअर इंडियाला आदेश

नवी दिल्ली : फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात झालेल्या ‘टर्ब्युलन्स’ (हवेचे धक्के) आणि विमान

Rahul Gandhi News: राहुल गांधी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशाविरोधात सर्वोच्च

Packaged Food : पॅकबंद अन्नावरील 'इशारा लेबल' प्रकरणी सुप्रीम कोर्ट संतप्त

नवी दिल्ली : पॅकबंद खाद्यपदार्थांमधील साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटचे उच्च प्रमाण दाखवणारे ‘इशाऱ्याचे लेबल्स’

Independence Day : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी लाल किल्ला सज्ज

नवी दिल्ली : यंदा शनिवार १५ ऑगस्ट २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत लाल किल्ल्यावर ८० वा

Sangeet Natak Akademi Award : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान

· महाराष्ट्रातील दहा कलावंतांचा राष्ट्रीय गौरव · संगीत, नृत्य, नाट्य व लोककलेतील योगदानाचा