Ashok Kharat Case : चिंचोक्यांपासून खडे बनवणारा व्यावसायिक एसआयटीच्या रडारवर

नाशिक : बाजारात सुमारे १०० रुपये किलो दराने मिळणाऱ्या चिंचोक्यांपासून आकर्षक खडे तयार करून ते ‘मंत्रबद्ध’ असल्याचे भासवून भोंदू अशोक खरात भाविकांना लाखो रुपयांना विक्री करत होता. यात खरातला मदत करणारा नाशिकरोड येथील व्यावसायिक आता रडारवर आला असून, त्याची एसआयटी कडून चौकशी होणार असल्याचे समजते. दरम्यान खरातची पोलिस कोठडी संपल्याने सोमवारी (दिनांक १३) न्यायालयात ऑनलाईन सुनावणी होणार असल्याचे समजते.


महिलांवरील लैंगिक अत्याचारांसह कोट्यवधींची संपत्ती उभी करणाऱ्या भोंदू अशोक खरात याचे नवनवीन कारनामे एसआयटीच्या तपासातून समोर येत आहेत.. नाशिकरोड परिसरातील या व्यावसायिकाकडे खरात चिंचोके देत असे. त्यापासून महागडे आणि आकर्षक दिसणारे खडे तयार करून देत असे. त्यानंतर खरात हे खडे आपल्या संपर्कातील भाविकांना त्यांच्या आर्थिक स्थितीनुसार हजारो ते लाखो रुपये वेगवेगळ्या किमतीत विकत असे.


खरातने उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण शिवारात ११ एकर जमीन खरेदी केल्याची माहितीही तपासातून पुढे आली आहे. ही जमीन प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी संपादनात येण्याची शक्यता होती. अधिक मोबदला मिळावा यासाठी त्या जमिनीत आंबा आणि डाळिंबाची लागवड केल्याचेही उघड झाले आहे. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर आणि बार्शी तालुक्यांतून जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संगनमत करून महामार्गाच्या रेखांकनाची माहिती खरातने मिळवली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


कल्पना खरातचा चौफेर शोध सुरूच : अशोक खरातने रणजित ब्रह्मचारी कोल्हाळ यांच्या मालकीची ११ एकर जमीन २८ मार्च २०२४ रोजी स्वतःच्या तसेच पत्नी कल्पना खरात यांच्या नावे खरेदी केल्याची नोंद कळमण येथील महसुली दप्तरी असल्याचे समजते. दुसरीकडे कल्पना खरात अद्याप गायब असून, पोलिसांकडून चौफेर शोध सुरू आहे.

Comments
Add Comment

बटलर - गिलमुळे गुजरातचा सलग दुसरा विजय, लखनौने गुजरातच्या गोलंदाजीपुढे गुडघे टेकले

लखनौ : इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत गुजरात टायटन्सने रविवारी लखनौ सुपर जायंट्सला त्यांच्या घरच्या मैदानात

Sunetra Pawar : राष्ट्रवादीतील नव्या दमाच्या लोकांना पुढे आणणार, सुनेत्रा पवारांची घोषणा

'कार्यकर्त्याला विश्वासात घेऊनच पुढील दिशा ठरविणार' बारामती : आगामी काळात विकासकामे आणि संघटनात्मक बांधणी

मागाठाणे–गोरेगाव १२० फूट डी.पी. रोड प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन

मुंबई : लोखंडवाला–मागाठाणे १२० फूट डी.पी. रोड या प्रकल्पाचे भूमिपूजन रविवार १२ एप्रिल रोजी कांदिवली पूर्व येथील

Asha Bhosle : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या पार्थिवाचे दर्शन

मुंबई : ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचे आज

Shiv Sena : पंढरपूरमध्ये शिवसेनेच्या ताकदीत वाढ; भगीरथ भालके, डॉ. प्रणिता भालके आणि आमदार तानाजी सावंतांचा पुतण्या शिवसेनेत

पंढरपूर : “विकासाचा वारकरी आणि धाडसी निर्णय घेणारा जननेता” अशी ओळख अधिक ठळक करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी

Nari Shakti Vandan Sammelan : पंतप्रधान नरेंद्र मोदी नारी शक्ती वंदन संमेलनाच्या माध्यमातून कर्तृत्ववान महिलांशी संवाद साधणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नारी शक्ती वंदन संमेलनाच्या