Asha Bhosle : सूरसम्राज्ञी 'आशा भोसले' यांचा संघर्षमय जीवनप्रवास

मुंबई : भारतीय संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध पार्श्वगायिका गायिका आशा भोसले यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शनिवारी ह्दयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.


आज म्हणजेच १२ एप्रिल २०२६ रोजी त्यांचं दुःखद निधन झालं. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रमाणेच आशा भोसले यांनीही आपल्या जादुई सुरांनी संगीत क्षेत्राला सजवलं. त्यांनी कित्येक आयकॉनिक गाण्यांना आवाज दिला.


आशा भोसले यांना संगीत क्षेत्रातून जितकं प्रेम मिळालं, तितकच त्यांचं वैयक्तिक आयुष्य दु:खात गेलं. वैविध्यपूर्ण गायनासाठी ओळखल्या जाणाऱ्या आशा ताईं वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणींना सामोरे गेल्या. आशा भोसले यांनी राम्या शर्मा यांनी लिहिल्या '‘Asha Bhosle: A Life In Music' या पुस्तकातील आपल्या बायोग्राफीमध्ये त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलू उलगडले.


आशा ताईंनी घरातून काढला होता पळ


त्यांच्या बालपणापासूनच आशा ताईंचा संघर्ष सुरू झाला होता. मोठेपणी त्यांची लता दीदींशी तुलना केली जात असतानाही आशा भोसले यांनी हार मानली नाही. लता मंगेशकर आपल्या काळातील सर्वात मोठ्या पार्श्वगायिका होत्या. आशा भोसले यांच्या नावावर सर्वाधिक गाणं गाणाऱ्या कलाकाराचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे.


१९४९ मध्ये आशा ताई १६ वर्षांच्या होत्या, त्यावेळी आशा भोसले या गणपतराव भोसले यांच्यासोबत घरातून पळून गेल्या होत्या. पुस्तकात दिल्यानुसार, आशा यांच्या लग्नावर त्यांची मोठी बहीण लता मंगेशकर या फार खूश नव्हत्या. त्यानंतर बराच काळ त्या आशा भोसलेंशी बोलल्याही नाहीत.



गणपतराव २० वर्षांनी मोठे होते


बायोग्राफीनुसार, आशा भोसले यांचे पती गणपतराव भोसले २० वर्षांनी मोठे होते. लग्नानंतर काही काळ सर्व ठीक सुरू होतं. पण, नंतर आशा आणि गणपतराव यांच्यात वाद होऊ लागला. आशा आणि गणपतराव यांना ३ मुलं होती. हेमंत, आनंद आणि मुलगी वर्षा.


पुस्तकानुसार, अशी अफवा आहे की, गणपतरावांना दारुचं व्यसन होतं आणि दारूच्या व्यसनात त्यांचं स्वत:वरील संतुलन राहत नव्हतं. नशेत ते पत्नीला मारहाण करीत होते. आशा ताई गर्भवती असताना त्यांना पतीकडून मारहाण करण्यात आली होती. आशा भोसले यांच्या सासरची मंडळी संकुचित विचारांच्या होत्या. बायोग्राफीत आशा भोसले यांनी म्हटलंय, माझे पती चिडचिडे होते. कदाचित त्यांना मला त्रास देण्यात मजा येत असावी. ते सर्वात दुःखी व्यक्ती होते, असं वाटतं. मात्र बाहेर कुणाला याबाबत माहीत नव्हतं.


जीवन संपवण्याचा केला प्रयत्न


बायोग्राफीत राम्या यांनी लिहिलं, जेव्हा आशा भोसले तिसरा मुलगा आनंदसाठी गर्भवती होत्या, त्यावेळी सासरच्या मंडळींनी त्यांना घराबाहेर काढलं होतं. याकाळात आशा ताईंनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या बायोग्राफीत आशा ताई लिहितात, एक वेळ होती, जेव्हा मला आत्महत्या करावी असं वाटत होतं. मी आजारी होते, ४ महिन्यांची गर्भवती होती. मी मानसिकदृष्ट्या तुटले होते. यात मी बाटलीभरून झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. मात्र माझ्या मुलाचं माझ्यावरील प्रेम इतकं होतं की त्यानं मला मरू दिलं नाही. या नात्यातून बाहेर पडल्यानंतर आशा भोसले यांनी प्रसिद्ध संगीतकार आणि गायक आर.डी.बर्मन यांच्यासोबत लग्न केलं. मात्र काही वर्षांनंतर दोघेही वेगळे झाले.


मुलांच्या मृत्यूनं खचल्या होत्या आशाताई


आशा यांच्या आयुष्यातील दु:ख संपतच नव्हतं. २००९ मध्ये आशा ताईंची मुलगी वर्षा भोसलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिनं झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. यातून ती बचावली. मात्र २०१२ मध्ये वर्षा भोसले यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. वर्षा भोसले या नैराश्यात होत्या, त्यातूनच त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जातं. माहितीनुसार, आशा भोसले यांचा मोठा मुलगा हेमंत भोसले यांचाही स्कॉटलँडमध्ये कर्करोगाच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला.


 
Comments
Add Comment

सिगारेटच्या पाकिटावर लिहिलं देशभक्तीचं अमर गीत! लतादीदींनी सुरुवातीला दिला होता नकार; ‘ऐ मेरे वतन के लोगों’ची कहाणी थक्क करणारी

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीच्या गाण्यांनी संपूर्ण देशाचं वातावरण भारून जातं. मात्र, ‘ऐ मेरे वतन के

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Dilip Kumar : ७८ वर्षांपूर्वी गाजलेलं बॉलिवूडचं देशभक्तीपर गाणं! मोहम्मद रफींचा आवाज, दिलीप कुमार यांच्यामुळे अजरामर झालेला इतिहास

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीपर गाण्यांनी वातावरण भारून जातं. ‘ऐ मेरे वतन के लोगों’, ‘मेरे देश की

Swara Bhasker News : स्वरा भास्करचा ट्रोलर्सवर जोरदार हल्लाबोल! 'त्या' एका वाक्याने बंद केली नेटकऱ्यांची बोलती

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. फहाद अहमद यांच्याशी

Rakesh Bedi : “भेसळ करणाऱ्यांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा!”; ‘धुरंधर’ फेम राकेश बेदींची संतप्त मागणी, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : आर्थिक फायद्यासाठी अन्न, पेये आणि मद्यामध्ये भेसळ करून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली

Ajay Devgan : बाॅलिवूडचा सिंघम 'अजय देवगण' लवरकच झळकणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

मुंबई : बॉलिवूडचा सिंघम म्हणून ओळखला जाणारा अभिनेता 'अजय देवगण' आता सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अजय