Nashik MNC Forced Conversion Case : आता थेट 'एनआयए' आणि 'सीबीआय' करणार बड्या रॅकेटचा पर्दाफाश!

नाशिक : नाशिकमधील एका नामांकित बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत सुरू असलेल्या लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या काळ्या कारभारावर पोलिसांनी अखेर हातोडा टाकला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अत्यंत गोपनीयरीत्या राबवलेल्या 'स्पेशल ऑपरेशन'मध्ये एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश मिळवले आहे.


आंतरराष्ट्रीय किंवा आंतरराज्य रॅकेट असण्याचा संशय :


अशातच आता या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी ​आता राज्याच्या पोलिसांनंतर केंद्रीय तपास यंत्रणा या मैदानात उतरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या संपूर्ण प्रकरणामागे एक मोठे आंतरराष्ट्रीय किंवा आंतरराज्य रॅकेट असण्याचा संशय बळावला असून, त्यामुळेच आता केंद्रीय यंत्रणांच्या तपासाची टांगती तलवार संबंधित दोषींवर असणार आहे.



केंद्रीय स्तरावर या प्रकरणाची दखल :


या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने आतापर्यंत गोळा केलेली अत्यंत महत्त्वाची आणि खळबळजनक माहिती एनआयए, एटीएस आणि सीबीआय या तिन्ही प्रमुख यंत्रणांना कळवली आहे. केवळ कामाच्या ठिकाणचे लैंगिक शोषणच नाही, तर त्यामागे विशिष्ट हेतूने केलेले धर्मांतरण आणि त्यातील आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे मोठे असण्याची चिन्हे आहेत. एसआयटीने दिलेल्या या माहितीमुळे आता केंद्रीय स्तरावर या प्रकरणाची दखल घेतली जात आहे.


​मिळालेल्या माहितीनुसार, या आयटी कंपनीत महिलांना विविध आमिषे दाखवून किंवा त्यांच्यावर दबाव टाकून त्यांचे शोषण केले जात होते. या प्रकरणाचा तपास करत असताना तपासी अधिकाऱ्यांच्या हाती काही धक्कादायक पुरावे लागले आहेत, जे एखाद्या मोठ्या गुन्हेगारी साखळीकडे निर्देश करतात. यामुळेच स्थानिक पातळीवरील तपासासोबतच आता राष्ट्रीय स्तरावरील यंत्रणांनी यात लक्ष घालणे आवश्यक असल्याचे मानले जात आहे. येत्या काही दिवसांत या प्रकरणाचा तपास अधिकृतपणे या केंद्रीय यंत्रणांकडे वर्ग होण्याची शक्यता असून, यामुळे नाशिकसह संपूर्ण आयटी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

reservation : अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरणाबाबत पुढील आठवड्यात सुनावणी

मुंबई : राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरण करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या

Why is Sharad Pawar silent on 'Urban Naxalites' : वारकरी संप्रदायातील 'अर्बन नक्षलवाद्यां'वर शरद पवार गप्प का?

नवनाथ बन यांचा सवाल; लव्ह जिहाद, लांगुलचालनावरून विरोधकांवर टीका मुंबई : "वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारांची

CM Devendra Fadnavis : छगन भुजबळ हेलिकॉप्टर अपघात प्रकरणाची चौकशी होणार - मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या हेलिकॉप्टरच्या अपघाती लँडिंगबाबत

Pratap Sarnaik : स्कूल बसचे भाडे आता सरकार ठरवणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

वाहनाचे लाईव्ह ट्रॅकिंग, पालकांना अलर्ट जाणार मुंबई : शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी

Nashik : नाशिक धर्मांतर प्रकरणात भाजप युवा मोर्चा आक्रमक

मुंबई : नाशिकमधील एका नामांकित मल्टिनॅशनल आयटी कंपनीत महिलांचे लैंगिक शोषण करून त्यांना धर्मांतरासाठी भाग

Women's Charter Adhikari : ‘मला महिला सचिव नको’; मंत्र्याच्या हट्टाचा महिला सनदी अधिकाऱ्याला अनुभव

अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांचा खळबळजनक दावा मुंबई : राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात