Nashik : नाशिक धर्मांतर प्रकरणात भाजप युवा मोर्चा आक्रमक

मुंबई : नाशिकमधील एका नामांकित मल्टिनॅशनल आयटी कंपनीत महिलांचे लैंगिक शोषण करून त्यांना धर्मांतरासाठी भाग पाडल्याच्या धक्कादायक प्रकाराने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाने आता आक्रमक पवित्रा घेतला असून, प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आणि दोषींवर कडक फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे.


मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या या कंपनीतील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून हा प्रकार केल्याचे उघड झाले आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या तरुणींना लक्ष्य करून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. या प्रकरणात आतापर्यंत ९ गुन्हे दाखल झाले असून पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे.


कृष्णराज महाडिक यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. "कंपन्यांमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी अंतर्गत यंत्रणा असावी, जुन्या आणि नवीन रुजू होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी बंधनकारक करावी," अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, धर्मांतराचा दबाव आणि शारीरिक शोषण करणाऱ्यांविरुद्ध विशेष पथकामार्फत कारवाई करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.


या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना कृष्णराज महाडिक म्हणाले, "नाशिकमधील ही घटना अत्यंत निंदनीय आहे. मॅनेजमेंटमधील लोकांनी सत्तेचा आणि पदाचा गैरवापर करून महिलांचे शोषण केले आहे. अशा विकृत मानसिकतेच्या लोकांना कंपन्यांनी तत्काळ कामावरून काढून टाकावे," असे आवाहन त्यांनी केले. तसेच, ज्या महिलांना कामाच्या ठिकाणी असुरक्षित वाटत असेल, त्यांनी न घाबरता भाजप युवा मोर्चाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

.......

आतापर्यंत पाच जणांना अटक


गेल्या काही वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. एका पीडित महिलेने धाडस दाखवून तक्रार केल्यानंतर या रॅकेटचा पर्दाफाश झाला. या प्रकरणात तौसिफ अत्तर, रझा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख आणि आसिफ अन्सारी या पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आणखी कोणापर्यंत पोहोचले आहेत, याचा तपास नाशिक पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment

Kangana Ranaut : "मी देशाची अंधभक्त!" ईशा कोप्पिकरच्या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ; तर खासदार कंगना राणौतची प्रतिक्रिया चर्चेत

मुंबई : अभिनेत्री ईशा कोप्पिकरने अलिकडेच सोशियल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत स्वतःला 'अंधभक्त' म्हटल्या

Marathi Bhasha : रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी बोलता न आल्यास 'बॅज' निलंबित करणार

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; २० ऑगस्टपासून राज्यभरात अंमलबजावणी मुंबई : राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना

Wardha Crime : 'साहेब, माझे पती गायब झालेत...' बायकोची तक्रार अन् तपासात बाहेर आलेलं 'ते' भयंकर सत्य

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर बाई येथे प्रेमसंबंधातून पतीची हत्या केल्याची धक्कादायक

Testicle Traffickers : कोट्यवधी रुपयांच्या आमिषाने प्रायव्हेट पार्ट काढला आणि विकत कोण घेईना म्हणून...सोशल मीडिया रील पाहून १६ वर्षीय मुलाची हत्या

भोपाळ : सोशल मीडियावरील एका चुकीच्या आणि अफवा पसरवणाऱ्या व्हिडिओमुळे एका १६ वर्षांच्या निष्पाप मुलाला आपला जीव

BWF World Championships : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा धडाका; लक्ष्य, उन्नती विजयी, ट्रीसा-गायत्री उपउपांत्यपूर्व फेरीत

नवी दिल्ली : भारतात सुरू असलेल्या BWF जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरू आहे.

Nashik Kumbhmela : कुंभाच्या मार्गावरील गावकरी आपत्कालीन मदतीसाठी होणार सज्ज; रस्ते, रेल्वेमार्गालगतच्या गावांमध्ये आपत्कालीन प्रतिसादाचे प्रशिक्षण

Nashik Kumbhmela : महासिंहस्थ कुंभमेळा २०२७साठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरकडे येणाऱ्या भाविकांच्या मार्गांवरील गावांनाही