Asha Bhosle Heart Attack : प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसलेंना हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात दाखल

मुंबई : प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आशा भोसले यांच्या तब्येतीविषयी ताजी माहिती अद्याप मिळालेली नाही पण त्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. आशा भोसलेंची नात झानई भोसले हिने इन्स्टा पोस्ट करून आजी ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगितले.





आशा भोसले मागील सात दशकांपासून पार्श्वगायन करत आहेत. त्यांनी मराठी, हिंदीसह अनेक भाषांतील चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे. चुनरिया या १९४८ मध्ये आलेल्या चित्रपटापासून आशा भोसले यांच्या पार्श्वगायनाच्या कारकि‍र्दीला सुरुवात झाली. आतापर्यंत त्यांनी वीसपेक्षा जास्त भाषांमध्ये १६ हजारांपेक्षा जास्त गाणी गायली आहेत. मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपुरी, तमिळ, मल्याळम, इंग्रजी आणि रशियनसह एकूण २० भाषांमध्ये आशा भोसले यांनी पार्श्वगायन केले आहे.


चतुरस्त्र गायिका आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी झाला. लता मंगेशकर त्यांची मोठी बहीण. लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या सुमधुर आवाजाने कोट्यवधी रसिकांना वेड लावले. आशा भोसलेंनी दोन हजारांपेक्षा जास्त चित्रपटांतून गाणी गायली आहेत. अनेक अल्बमसाठीही त्यांनी गाणी गायली आहेत. आशा भोसलेंना २००८ मध्ये पद्मविभूषण या पुरस्काराने गौरविण्यात आले. इतर अनेक पुरस्कारांनीही त्यांना गौरविण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Raja Shivaji : 'राजा शिवाजी' सिनेमातील अजय-अतुलच्या 'छत्रपती अँथम'चा 'हा' व्हिडिओ पाहिलात का ?

मुंबई : अभिनेता रितेश देशमुखच्या बहुप्रतिक्षित 'राजा शिवाजी' (Raja Shivaji ) सिनेमाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता

Bigg Boss Marathi 6 : रेस टू फिनालेसाठी लढत रंगली, भाऊचा धक्कामध्ये कोणाला धक्का मिळणार आणि कोणाची वर्णी लागणार ?

मुंबई : बिग बॉस मराठी सीझन ६ ( Bigg Boss Marathi 6 ) आता शेवटच्या टप्प्यात आहे. बिग बॉस मराठीला आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत

माध्यमांतराची गाथा...

कोणत्याही क्षेत्रातल्या कुणा व्यक्तीची जन्मशताब्दी असली की त्या व्यक्तीने त्या क्षेत्रात जे योगदान दिले आहे,

Ek Din : मोठ्या पडद्यावर ५० वर्षांनंतर पुन्हा खुलणार जपानी रोमांस, 'एक दिन' सिनेमातील 'कोनिचिवा' गाणं रिलीज

मुंबई : अभिनेता आमिर खान प्रोडक्शन्सची आगामी फिल्म ‘एक दिन’, ज्यामध्ये साई पल्लवी आणि जुनैद खान मुख्य भूमिकेत

Gayatri Datar : 'त्या' प्रकरणाबाबत गायत्री दातारची आणखी एक पोस्ट, म्हणाली...

मुंबई : 'तुला पाहते रे' मालिकेतून घराघरात पोहचलेली लोकप्रिय अभिनेत्री गायत्री दातार हिच्यासोबत एक धक्कादायक

Nick Jonas : बॉलिवूडच्या गाण्याची निक जोनसला भूरळ, पत्नी प्रियांका नव्हे तर माधुरीच्या 'या' प्रसिद्ध गाण्यावर थिरकला

मुंबई : भारतीय सिनेसृष्टी जगभरात प्रसिद्ध असून बॉलिवूडच्या सिनेमांसोबतच गाण्यांनाही जगभरात पंसती मिळते.