Gayatri Datar : 'त्या' प्रकरणाबाबत गायत्री दातारची आणखी एक पोस्ट, म्हणाली...

मुंबई : 'तुला पाहते रे' मालिकेतून घराघरात पोहचलेली लोकप्रिय अभिनेत्री गायत्री दातार हिच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला. कॅब बुकिंग रद्द केल्याच्या कारणावरून एका कॅब ड्रायव्हरनं तिला सतत फोन करून शिवीगाळ केली, धमक्या दिल्या आणि तिचा वैयक्तिक मोबाईल नंबर सोशल मीडिया ग्रुप्सवर व्हायरल केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकारानंतर गायत्री प्रचंड घाबरलेली. या संपूर्ण घटनेची माहिती गायत्रीनं सोशल मिडिया पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती
पण आता तिने या प्रकरणात FIR दाखल करणार नसल्याचं सांगितलं आहे.


आता गायत्रीनं आणखी एक पोस्ट शेअर करत या प्रकरणात नेमकं काय घडलंय त्याचे अपडेट्स दिले आहेत. या पोस्टमध्ये गायत्रीनं म्हटलंय की, 'हॅलो! माझ्या मागील पोस्टसंदर्भात एक अपडेट... तर, तो ड्रायव्हर दुपारपर्यंत वेगवेगळ्या नंबरवरून मला फोन करत होता. त्यानं माझा नंबर एका ड्रायव्हर्सच्या ग्रुपवर सुद्धा शेअर केला. त्यानंतर त्याचे फोन आणखीनच वाढले.अनेक तास हा भयानक अनुभव आल्यानंतर, अखेरीस माझ्या एका पोलीस अधिकारी मित्रानं मला मदत केली.


त्या माणसानं अखेर मला फोन करणं थांबवलं. जे काही घडलं, ते विसरण्याचा मी आणि माझे कुटुंब अजूनही प्रयत्न करत आहोत. तुमच्या प्रचंड पाठिंब्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. मी या व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करत नाहीये, कारण मला यावर आणखी वेळ किंवा शक्ती वाया घालवायची नाहीये, असंही गायत्रीनं म्हटलं आहे.


गायत्री दातारला गुरुवारी म्हणजेच ९ एप्रिल रोजी सकाळी मुंबईहून पुण्याला जायचं होतं. त्यासाठी तिने एका प्रसिद्ध ऑनलाइन अ‍ॅपवरून कॅब बुक केली होती. मात्र, पॅकिंगला वेळ लागणार असल्याचं लक्षात आल्यावर तिनं कॅब येण्यापूर्वीच ती कॅन्सल केली. या साध्या कारणावरून संबंधित ड्रायव्हर संतापला आणि त्याने गायत्रीला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली.


गायत्रीनं हा प्रकार सोशल मीडियावर शेअर केला. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिनं घडलेला प्रकार सांगितला होता. कॅब रद्द केल्यापासून तो ड्रायव्हर गेल्या २-३ तासांपासून मला वेगवेगळ्या नंबरवरून सतत फोन करत आहे. त्याने मला फोनवर अत्यंत गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली. मला आता माझ्या स्वतःच्या सोसायटीतून बाहेर पडायलाही भीती वाटतेय. मी प्रचंड घाबरले असून मला रडू येत आहे, असं अभिनेत्री गायत्री दातारनं त्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

Comments
Add Comment

Arjun Rampal : ८ वर्षांच्या सहवासानंतर अखेर जोडले बंध; अभिनेता अर्जुन रामपालने गोव्यात गर्लफ्रेंड गॅब्रिएलासोबत उरकले लग्न!

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची दीर्घकाळाची जोडीदार गॅब्रिएला डेमेट्रियाडेस यांनी अखेर अधिकृतपणे

Taapsee Pannu : तापसी पन्नूच्या 'गांधारी' चित्रपटाची पहिली झलक समोर; टीझरने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट 'गांधारी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचे दिग्दर्शन

Sandeep Vanga vs Deepika Padukone : दीपिका पादुकोणमुळे ‘स्पिरीट’ची कथा फुटली ? ५-६ कोटींचा वाद अन् १०% चा वाटा; वांगा बंधूंचा दीपिका पादुकोणवर सनसनाटी आरोप

मुंबई : दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांच्या आगामी ‘स्पिरीट’ (Spirit Movie) या बहुचर्चित चित्रपटाभोवतीचा वाद

Vanita Kharat : सावध राहा! ऑनलाईन पार्सलच्या जाळ्यात अडकली वनिता खरात; अभिनेत्रीनेच उघड केली भामट्यांची नवी शक्कल!

मुंबई : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरातसोबत पार्सलच्या नावाने ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार

Akshaye Khanna : धुरंधरचा 'रहमान डकैत' आता गुरु शुक्राचार्यांच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना त्याच्या नवनवीन आणि आव्हानात्मक भूमिकांसाठी चर्चेत आला. 'छावा'मधील 'औरंगजेब'

Sonu Nigam : "ते १२ रुपये फ्रेम करून मी आजही माझ्या ऑफिसमध्ये लावले आहेत", सोनू निगमने सांगितला जबरदस्त किस्सा

मुंबई : अनेक कलाकार बरेचदा आपल्या चाहत्यांचं प्रेम जाणून घेण्यासाठी वेशांतर करुन त्यांच्यात वावरतात. २०१६ मध्ये