Raja Shivaji : 'राजा शिवाजी' सिनेमातील अजय-अतुलच्या 'छत्रपती अँथम'चा 'हा' व्हिडिओ पाहिलात का ?

मुंबई : अभिनेता रितेश देशमुखच्या बहुप्रतिक्षित 'राजा शिवाजी' (Raja Shivaji ) सिनेमाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. 'जिओ स्टुडिओज' आणि 'मुंबई फिल्म कंपनी'कडून सादर होत असलेल्या 'राजा शिवाजी' या सिनेमाचं  पोस्टर नुकताच रिलीज करण्यात आलं होतं. तर आता निर्मात्यांनी सिनेमातील ‘राजा शिवाजी अँथम’ अर्थात “छत्रपती” या गीताचा चित्रीकरणामागील (BTS) एक भव्य आणि ऊर्जा देणारा व्हिडिओ प्रदर्शित केला आहे. या BTS व्हिडिओमधून सिनेमाच्या निर्मितीची भव्यता, संगीताची ताकद आणि संपूर्ण टीमची मेहनत यांची एक झलक पाहायला मिळते, ज्यामुळे या ऐतिहासिक महाकाव्याबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.


या सिनेमातील हे गीत सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केली असून, त्यांनीच ते आपल्या दमदार आवाजात सादर केलं आहे. या गीताच्या BTS व्हिडिओमध्ये मोठ्या पडद्यावरील अनुभव अधिक प्रभावी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भव्य, शक्तिशाली आणि उत्तुंग अशा संगीत रचनेची स्पष्ट झलक दिसून येत आहे.


यातील प्रत्येक स्वर आणि प्रत्येक दृश्यामागे बारकाईनं केलेली मेहनत या व्हिडिओतून जाणवते. याआधी या गीताचा मुखडा प्रदर्शित झाला होता आणि प्रेक्षकांनी त्याला मोठ्या उत्साहानं प्रतिसाद दिला होता. आता BTS व्हिडिओनंतर या गाण्याबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


‘राजा शिवाजी अँथम’ “छत्रपती” हे येत्या १३ एप्रिल २०२६ रोजी रिलीज होणार असून, या गीतातून हिंदवी स्वराज्याचा आत्मा, शौर्य आणि प्रेरणा नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संगीत, दृश्यरचना आणि भावनिक उंची यांचा संगम असलेलं हे गीत सिनेमाचा आत्मा ठरणार असल्याची सर्वत्र चर्चा आहे.



या सिनेमाचे दिग्दर्शन रितेश विलासराव देशमुख यांनी केलं असून, त्यांनीच लेखक, निर्माता आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत तिहेरी जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे. त्यांच्या या जबरदस्त भूमिकेमुळे सिनेमाला एक वेगळीच उंची मिळणार असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. या सिनेमात संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनिलिया देशमुख यांसारखे दिग्गज कलाकार झळकणार आहेत.


'जिओ स्टुडिओज' प्रस्तुत आणि 'मुंबई फिल्म कंपनी' निर्मित या सिनेमाची निर्मिती ज्योती देशपांडे आणि जिनिलिया देशमुख यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित राजा शिवाजी १ मे २०२६ रोजी जगभरात मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.हा सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत.

Comments
Add Comment

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Dilip Kumar : ७८ वर्षांपूर्वी गाजलेलं बॉलिवूडचं देशभक्तीपर गाणं! मोहम्मद रफींचा आवाज, दिलीप कुमार यांच्यामुळे अजरामर झालेला इतिहास

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीपर गाण्यांनी वातावरण भारून जातं. ‘ऐ मेरे वतन के लोगों’, ‘मेरे देश की

Swara Bhasker News : स्वरा भास्करचा ट्रोलर्सवर जोरदार हल्लाबोल! 'त्या' एका वाक्याने बंद केली नेटकऱ्यांची बोलती

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. फहाद अहमद यांच्याशी

Rakesh Bedi : “भेसळ करणाऱ्यांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा!”; ‘धुरंधर’ फेम राकेश बेदींची संतप्त मागणी, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : आर्थिक फायद्यासाठी अन्न, पेये आणि मद्यामध्ये भेसळ करून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली

Ajay Devgan : बाॅलिवूडचा सिंघम 'अजय देवगण' लवरकच झळकणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

मुंबई : बॉलिवूडचा सिंघम म्हणून ओळखला जाणारा अभिनेता 'अजय देवगण' आता सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अजय

Madhuri Dixit : लवकरच...! सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री माधुरी दीक्षित

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर