Ek Din : मोठ्या पडद्यावर ५० वर्षांनंतर पुन्हा खुलणार जपानी रोमांस, 'एक दिन' सिनेमातील 'कोनिचिवा' गाणं रिलीज

मुंबई : अभिनेता आमिर खान प्रोडक्शन्सची आगामी फिल्म ‘एक दिन’, ज्यामध्ये साई पल्लवी आणि जुनैद खान मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. ही एक अतिशय सुंदर आणि मनाला भिडणारी प्रेमकथा असणार आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. त्याचा शानदार ट्रेलर आणि गाण्यांमुळे ही प्रेमकथा पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढवली आहे. नुकताच या सिनेमाच्या रिलीज झालेल्या ‘कोनिचिवा’ गाण्यानं सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे.


जपानी भाषेत “कोनिचिवा”चा अर्थ “हॅलो” असा होतो, ‘एक दिन’मधील ‘कोनिचिवा’ हे गाणं आपल्याला “हॅलो” म्हणण्याची कला शिकवणारा एक खास ट्रॅक आहे. या गाण्यात त्याचा अतिशय सुंदर वापर करण्यात आला आहे. ‘लव्ह इन टोकियो’ (1966) मधील ‘सायोनारा सायोनारा’ या गाण्याला पाच दशकांहून अधिक काळ लोटला आहे, ज्यानं जपानी शब्दाद्वारे “बाय” म्हणणं शिकवलं होतं.



आता पुन्हा अनेक वर्षांनंतर असं एक गाणं आलं आहे, जे दुसऱ्या भाषेत “हॅलो” म्हणण्याच्या सौंदर्याची अनुभूती देतं. ऊर्जा आणि आनंदानं भरलेलं ‘कोनिचिवा’ हे गाणं जपानच्या निसर्गरम्य ठिकाणी चित्रित करण्यात आलं आहे, जे सिनेमाच्या भावनिक गाभ्याशी पूर्णपणे जुळते आणि प्रेक्षकांशी लगेच जोडलं जातं. हे गाणं आपल्याला “हॅलो”चा खरा अर्थ दर्शवतो. एक अशी सुरुवात, जी नव्या प्रवासाकडे घेऊन जाते.


‘एक दिन’च्या माध्यमातून आमिर खान आणि दिग्दर्शक मंसूर खान अनेक वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले असल्यानं हिंदी सिनेमातील सर्वात आवडत्या जोड्यांपैकी एका जोडीचं पुनरागमन झालं आहे. यापूर्वी त्यांनी ‘कयामत से कयामत तक’, ‘जो जीता वही सिकंदर’, ‘अकेले हम अकेले तुम’ आणि ‘जाने तू... या जाने ना’ यांसारखे अनेक संस्मरणीय सिनेमे दिले आहेत. आता ‘एक दिन’सोबत ही जोडी पुन्हा एकत्र आली आहे. ज्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.



त्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा पडद्यावर त्यांची जादू पाहायला मिळणार आहे. आमिर खान प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली बनलेला ‘एक दिन’ या सिनेमात साई पल्लवी आणि जुनैद खान मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन सुनील पांडे यांनी केलं असून, निर्माते आमिर खान, मंसूर खान आणि अपर्णा पुरोहित आहेत. हा सिनेमा येत्या १ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Comments
Add Comment

Shubha Godbole Cancer : मेधा मांजरेकर नंतर 'या' जेष्ठ अभिनेत्रीने केला 'केमो कर्ल्स'मधून आपल्या कॅन्सरचा उलगडा

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी कॅन्सरशी

Eetha Movie : 'इठा' चित्रपटावर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार! विठाबाईंच्या कुटुंबीयांचा संताप; म्हणाले, "इतिहासाची मोडतोड खपवून...

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या तिच्या आगामी 'इठा' (Eetha) चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. हा

Star Pravah New Serial : 'आमच्या लाडक्या नाईक बाई' ऐश्वर्या नारकर यांचं ८ वर्षांनी स्टार प्रवाहवर पुनरागमन; नव्या मालिकेत साकारणार हाडाच्या शिक्षिकेची भूमिका

मुंबई : शाळा (School) म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते वर्गखोल्या (Classroom), फळ्यावरचं लेखन (Blackboard), प्रार्थना (Prayer), मधल्या

Ratris Khel Chale Actress : ‘रात्रीस खेळ चाले’च्या शेवंतांमध्ये नवा वाद! कृतिका तुळसकरने अपूर्वा नेमळेकरला ठणकावलं

मुंबई : ‘रात्रीस खेळ चाले’ (Ratris Khel Chale) या लोकप्रिय मालिकेतील ‘शेवंता’ (Shevanta) या भूमिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर

Amitabh Bachchan : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यावर शस्त्रक्रिया; ICU मध्ये उपचारानंतर डिस्चार्ज, ब्लॉगमधून दिली प्रकृतीची माहिती

Amitabh Bachchan : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रकृती

Weekend Watchlist : या आठवड्यात ओटीटीवर काय पाहणार? ८ नव्या चित्रपट-वेब सिरीजची यादी

मुंबई : या आठवड्यात ओटीटीवर (OTT) काय पाहायचं? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तर ही यादी तुमच्यासाठीच आहे. २० ते २६