'Operation Tiger' : खासदार फुटी’च्या अफवांचे सूत्रधार उबाठाचेच नेते!

अपयशावरून लक्ष हटवण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर’चे थोतांड; खासदार नरेश म्हस्के यांची घणाघाती टीका


मुंबई : निवडणुकांमधील सलग पराभव, नेतृत्वाचे अपयश आणि पक्षात उफाळलेली तीव्र नाराजी यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी ‘उबाठा’ गटाचे नेतेच खासदार फुटीच्या खोट्या बातम्या पसरवत आहेत. ‘ऑपरेशन टायगर’ वगैरे काहीही नसून, आपल्याच खासदारांना बदनाम करण्यासाठी ही केविलवाणी धडपड सुरू आहे, अशी बोचरी टीका शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केली.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उबाठाच्या खासदारांमध्ये ठाण्यात गुप्त बैठक झाल्याच्या वृत्ताचा म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत तीव्र शब्दांत निषेध केला. अशा प्रकारची कोणतीही बैठक झालेली नाही, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


खासदार म्हस्के म्हणाले की, “काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्लीत सर्वपक्षीय खासदारांसाठी स्नेहभोजन आयोजित केले होते. महाराष्ट्रातील सर्व पक्षांचे खासदार एकमेकांच्या संपर्कात असणे, एकत्र जेवणे ही आपली राजकीय संस्कृती आहे. मात्र, अशा संवादाचा अर्थ ‘पक्ष फूट’ असा लावणे पूर्णतः चुकीचे आहे. माध्यमांत फिरणाऱ्या बातम्या पूर्णपणे निराधार आहेत.”



उबाठा अंतर्गत बंडाळीने अस्वस्थ


उबाठा गटाचे नेतृत्व सध्या अंतर्गत बंडाळीने ग्रासले असल्याचा दावा करत म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. “उबाठाच्या नेत्यांचा स्वतःच्या खासदारांवर विश्वास राहिलेला नाही. खासदारांना बदनाम करण्यासाठी संजय राऊत हेच अशा बातम्या पेरण्याचे कारस्थान करत आहेत. राऊतांच्या अशाच कार्यपद्धतीमुळे हा पक्ष आज मृतावस्थेत गेला आहे,” अशी खरमरीत टीका त्यांनी केली.



पक्षांतर्गत शीतयुद्ध


यावेळी म्हस्के यांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात ‘शीतयुद्ध’ सुरू असल्याचा दावा केला. “आदित्य ठाकरे हे राऊतांना जाब विचारत असून राऊतांची पक्षातच अवस्था बिकट झाली आहे. दुसरीकडे, अरविंद सावंत यांना त्यांचे पक्षांतर्गत हितशत्रूच टार्गेट करत आहेत. त्यांना वारंवार स्वतःच्या निष्ठेची अग्निपरिक्षा द्यावी लागते, यावरूनच उबाठा गटात काय चालले आहे हे स्पष्ट होते,” असा टोलाही त्यांनी लगावला.

Comments
Add Comment

Khelo India : खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

· महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम · पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित मुंबई : हॉकीपटू मेजर

Nitesh Rane : राज्यातील सागरी विकास प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी द्या!

- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम

Ashish Shelar : गडकिल्ले, ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला गती; मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील गडकिल्ले, प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला अधिक गती देण्यासाठी जिल्हा

CM Devendra Fadnavis : 'दहीहंडी'च्या ऑलिम्पिकमधील समावेशासाठी प्रयत्न करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; वरळीत दिमाखात पार पडले 'प्रो-गोविंदा' लीगचे उद्घाटन मुंबई :

Chandrakant Patil : स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांत मराठी भाषा विभाग अनिवार्य; NEPच्या प्रभावी अंमलबजावणीचा चंद्रकांत पाटील यांच्याकडून आढावा

मुंबई : राज्यातील स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण