Minister Nitesh Rane : मत्स्यव्यवसायात महाराष्ट्र नंबर वन करणार - मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : मत्स्यव्यवसायात राज्याला देशात अग्रस्थानी नेण्यासाठी राज्य शासनाने अनेक योजना, उपक्रम सुरू केले आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे तितकेच महत्त्वाचे आहे. या माध्यमातून मत्स्यव्यवसायात महाराष्ट्र नंबर वन करण्यात येईल, असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले.


मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना, कृषी समकक्ष दर्जा व त्या अनुषंगाने सवलती आणि केंद्र शासनाच्या योजना अंमलबजावणीबाबत भा.कृ.अनु.प. (भारतीय कृषी अनुसंधान परिषद)- केंद्रीय मात्स्यिकी शिक्षण संस्था, वर्सोवा येथे आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, एमएफडीसी चे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले, केंद्रीय मात्स्यिकी शिक्षण संस्थेचे, संचालक श्री. शाहुजी आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.


मत्स्यव्यवसाय मंत्री राणे म्हणाले, मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. मत्स्यव्यवसाय क्षेत्राला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेस अन्य योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थीस देऊन त्याला अधिक सक्षम करण्यासाठी अधिकाऱ्यांनी काम करावे. विभागाच्या योजनांची व्यापक प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी जिल्हास्तरावर कॅम्प घेऊन जनजागृती करावी. तसेच यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा, असेही ते म्हणाले.


मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजनांसाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला असल्याचे सांगत, मत्स्यव्यवसाय मंत्री राणे म्हणाले, भविष्यात राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजनांचा अभ्यास अन्य राज्यांनी करावा असे वातावरण निर्माण करण्यासाठी विभागातील सर्वच घटकांनी टीमवर्क म्हणून काम करावे. योजनांच्या अंमलबजावणीत उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा गौरव केला जाईल असे सांगून मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले, यासाठी स्पर्धा आयोजित केली जाईल.


मत्स्यव्यवसाय सचिव डॉ. एन. रामास्वामी म्हणाले, मत्स्यव्यवसाय मध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी राज्यस्तर व जिल्हा नियोजन मधून २८ योजना राबविण्यात येत आहेत. जिल्हास्तरावरील योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा नियोजन मधून अधिकचा निधी अधिकाऱ्यांनी उपलब्ध करून घ्यावा. मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना क्लस्टर पद्धतीने राबविल्या जाणार असून या योजनांच्या माध्यमातून उत्पादकता वाढण्यास मदत होईल. विभागाच्या योजनांची लाभार्थी निवड देखील अधिकाऱ्यांनी मिशन मोडवर करावी असेही त्यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना सांगितले.


मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार म्हणल्या, अर्थव्यवस्थेमध्ये मत्स्यव्यवसाय महत्त्वाचा भाग आहे. विभागाच्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करून मत्स्यव्यवसायाला अधिक गती देण्यासाठी विभागाच्या योजना लाभार्थीने पोहोचवण्यास सर्वांनीच पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.


या कार्यशाळेत मत्स्यव्यवसाय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Comments
Add Comment

Pune News : मांजरी स्टेशनचा कायापालट तर रामटेकडीला मिळणार नवे ब्लॉक स्टेशन

पुणे : पुणे रेल्वे विभागाने वाढती प्रवासी गर्दी आणि रेल्वे वाहतुकीवरील ताण लक्षात घेऊन दोन महत्त्वाचे प्रकल्प

CM Fellowship : तरुणांसाठी मंत्रालयात कामाचा थाट, पगारही जोरात! मुख्यमंत्री फेलोशिपसाठी महिना ६१,५०० रुपयांची संधी; कसा कराल अर्ज ?

मुंबई : राज्यातील कल्पक आणि उत्साही तरुणांसाठी प्रशासकीय सेवेचा अनुभव घेण्याची सुवर्णसंधी पुन्हा एकदा उपलब्ध

Chhatrapati Sambhajinagar Crime : थरारक! छत्रपती संभाजीनगरमध्ये भरदिवसा प्रेयसीची गळा चिरून हत्या; पेट्रोल पंपावरील घटनेने जिल्हा हादरला

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील करमाड परिसरात आज दुपारी माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत भीषण घटना घडली. एका

Minister Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून..... निफाड तालुक्यातील निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ३ कोटी ३८ लाखांच्या मुख्य इमारतीच्या बांधकामाला मंजुरी

निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्रास मिळणार सुसज्ज विस्तारीत इमारत.... येवला : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व

Nitesh Rane : 'हिरव्या सापांना ठेवण्याची गरज, महाराष्ट्र जिहादमुक्त करणारच!'; नाशिकच्या 'कॉर्पोरेट जिहाद'वरून मंत्री नितेश राणे आक्रमक

पाकिस्तानातून यांचा अब्बा आला, तरी 'देवभाऊ' सोडणार नाहीत... मुंबई : "आमच्यावर हिंदू-मुस्लिम केल्याची टीका

Chief Minister Devendra Fadnavis : नवकार महामंत्रामध्ये विश्व कल्याणाची शक्ती -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : सर्व जगामध्ये नवकार महामंत्राचा आजच्या पवित्र दिवशी सामूहिक जप होत आहे. आपली संस्कृती ही