LED fishing boats will be cancelled : एलईडी मासेमारी बोटींना डिझेल पुरवठा करणाऱ्या मच्छिमार संस्थांची नोंदणी रद्द करणार
April 8, 2026 07:02 PM
LED Fishing Boat
मंत्री नितेश राणे यांचा इशारा; पारंपरिक मच्छिमारांना त्रास देणाऱ्यांची खैर नाही
मुंबई: राज्यात एलईडी मासेमारीवर अधिकृत बंदी असतानाही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आता राज्य सरकारने कठोर पवित्रा घेतला आहे. एलईडी मासेमारी करणाऱ्या बोटींना डिझेलचा पुरवठा करणाऱ्या मच्छिमार संस्थांना आम्ही हेरले असून, अशा संस्थांची नोंदणी आणि परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी बुधवारी दिला.
अलिबागच्या आक्षी-साखर येथे ग्रोयान्स बंधारा, जेट्टी, पोहोच रस्ता बांधकाम आणि नौकानयन मार्गातील गाळ काढण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. या प्रसंगी आमदार महेंद्र दळवी, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर उपस्थित होते.