Gahininath fort : गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी कटिबद्ध - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लाखो भाविकांच्या उपस्थितीत नारळी सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न


बीड : म्हसोबावाडी (ता. आष्टी, जि. बीड) येथे पार पडलेल्या श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाच्या ९४ व्या नारळी सप्ताहाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत भावनिक शब्दांत आपली भूमिका मांडली, “मी येथे मुख्यमंत्री म्हणून नाही, तर गहिनीनाथ महाराजांचा अनुयायी म्हणून नतमस्तक होण्यासाठी आलो आहे. गडाच्या विकासासाठी रस्ता असो वा अन्य कोणताही प्रश्न, तो सोडविण्यास मी कटिबद्ध आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.


संत वामनभाऊ महाराज यांनी सुरू केलेल्या या परंपरेचा समारोप गुरुवारी (दि. ९) काल्याच्या कीर्तनाने झाला. यावेळी गहिनीनाथ गडाचे विठ्ठल महाराज, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार धनंजय मुंडे, माजी आमदार भीमराव धोंडे, माजी आमदार साहेबराव दरेकर, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, बाळासाहेब आजबे, प्रताप ढाकणे, सरपंच शिवा शेकडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “संत वामनभाऊ यांनी केलेले कार्य अविस्मरणीय आहे. नाथ संप्रदायात गहिनीनाथांचे महात्म्य मोठे असून, या गडावर प्रत्येक काम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडते, हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे.” विशेष म्हणजे, या नारळी सप्ताहाचे नियोजन २०३९ पर्यंत निश्चित झाले आहेत यातच या भक्तीकार्याचे यश दिसते .समाजाला एकत्र आणण्याचे हे काम अतिशय मोलाचे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.


पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, “गहिनीनाथ गडाचा नारळी सप्ताह कायमस्वरूपी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यजमानपदाखाली व्हावा व त्यांनी गडाचे पालकत्व घ्यावे, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा देत, त्यांच्या विचारांवर आपण काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.


दरम्यान, आमदार सुरेश धस यांनी नगर-बीड महामार्गाच्या कामासाठी भरीव निधीची मागणी करत, या रस्त्यावर होणारे अपघात रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. नारळी सप्ताह कार्यक्रमास भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

Comments
Add Comment

Onion processing industry: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा प्रक्रिया उद्योगास चालना देणार - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा दरातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळून स्पर्धात्मक दर मिळावा,

Industries Minister Dr. Uday Samant : पांढरकवडा येथे 86 हेक्टरवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापनेला गती - उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केळापूर तालुक्यातील मौजे

Industries Minister Dr. Uday Samant - 'एमआयडीसी’कडे लवकरच हस्तांतरित करणार : उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरन येथील 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी

Ashok Kharat : 'लक्ष्मण' ते भोंदूबाबा 'अशोक खरात'; ४० वर्षांपूर्वीच गावकऱ्यांनी दिला होता बेदम चोप!

अहिल्यानगर : महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या अशोक खरात याच्या कृत्यांची मुळं चाळीस

All priests will earn the same : मंदिरांतील पुजाऱ्यांचे मानधन एकसमान होणार

राज्य सरकार धोरण ठरवणार; मंत्रालयात झाली विशेष बैठक मुंबई : काही देवस्थानांमध्ये पुजाऱ्यांना नियमित वेतन दिले

Jalna Murder Case : आयुष्याची नवीन सुरुवात करण्यासाठी ठरवलेला दिवसच ठरला अंतिम, पोटच्या मुलानेच केली निघृण हत्या

जालना जिल्ह्यामधील अंबड तालुक्यात एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. पोटच्या मुलानेच आपल्या