Industries Minister Dr. Uday Samant - 'एमआयडीसी’कडे लवकरच हस्तांतरित करणार : उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरन येथील 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी उर्वरित क्षेत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावास गती देण्यात द्यावी, असे निर्देश उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांनी दिले.


उद्योग मंत्री डॉ.सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात झाली. बैठकीस पणन व रोजगार हमी मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासु, सहमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा घुगे, उद्योग विभागाचे सहसचिव श्रीकांत पुलकुंडवार, महाजनकोचे संबंधित अधिकारी तसेच मे. टी.पी. कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.


या बैठकीत सुमारे 1350 एकर एकूण क्षेत्रांपैकी अंदाजे 400 ते 500 एकर जमीन महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाकडे हस्तांतरित करण्याबाबत महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महाजनको) च्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रस्तावावरील तांत्रिक व प्रशासकीय बाबींचा आढावा घेऊन आवश्यक त्या कार्यवाहीस गती देण्याचे निर्देश डॉ.सामंत यांनी दिले.


महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमार्फत मौजे मेथी व विखरन (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथे 250 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी एकूण 540.05 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. यामध्ये खाजगी वाटाघाटीद्वारे 476.06 हेक्टर, भूसंपादन अधिनियमांतर्गत 28.66 हेक्टर तसेच शासकीय 34.91 हेक्टर जमिनीचा समावेश आहे.


यापूर्वी यांनी सुमारे 900 एकर जमीन सौर प्रकल्पासाठी देऊन उर्वरित सुमारे 400 एकर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने अंतिम निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात येणार असून, यात संबंधित बाबींचा सर्वंकष आढावा घेऊन अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईल, असे उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांनी सांगितले.

Comments
Add Comment

106 Maharashtra Martyrs To Be Honored : संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा

Pune Weather : पुण्यात रविवारी पावसाच्या सरींची शक्यता; घाटमाथ्यावर यलो अलर्ट

पुणे : रविवार, 16 ऑगस्ट रोजी पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता

Chhagan Bhujbal : जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी करणे हा सामाजिक न्यायाच्या दिशेने ऐतिहासिक निर्णय – मंत्री छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभार पत्र मुंबई : केंद्र सरकारने जनगणना

Eknath Shinde : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

जनतेच्या दारात दर्जेदार उपचार पोहोचवण्याचा निर्धार मुंबई : “हे सरकार फक्त आदेश देणारे नाही, तर जनतेच्या दारात