Jalna Murder Case : आयुष्याची नवीन सुरुवात करण्यासाठी ठरवलेला दिवसच ठरला अंतिम, पोटच्या मुलानेच केली निघृण हत्या

जालना जिल्ह्यामधील अंबड तालुक्यात एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. पोटच्या मुलानेच आपल्या वडिलांची कुऱ्हाडीनं वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण आणि एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच गुरुवारी ९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ५ वाजताच्या सुमारास अंबड तालुक्यातील रुई गावात सकाळच्या सुमारास दिलीप राजगुरू (वय ४५) यांचं पार्थिव त्यांच्या राहत्या घराजवळ रक्तरंजित अवस्थेत आढळून आलं. ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ तीर्थपुरी पोलीस ठाण्याला माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करत तपासाला सुरुवात केली. प्राथमिक तपासात दिलीप राजगुरू यांच्या डोक्यावर आणि शरीरावर कुऱ्हाडीचे गंभीर घाव असल्याचं आढळून आलं, त्यामुळे ही हत्या असल्याचं स्पष्ट झालं.


या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. दिलीप राजगुरू यांचा स्वतःचा मुलगा विलास राजगुरू (वय १९) यानेच आपल्या एका साथीदाराच्या मदतीनं ही हत्या केल्याचं उघड झालं. पोलिसांनी संशयाच्या आधारे विलासला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली. या हत्येमागील कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.


नेमकं काय घडलं ?


विलासच्या आईचं म्हणजेच दिलीप राजगुरू यांच्या पत्नीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं. त्यानंतर ते एकटेच राहत होते. दरम्यान, त्यांनी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला होता आणि विशेष म्हणजे, विवाहाच्या दिवशीच त्यांची हत्या करण्यात आली.  वडिलांच्या या निर्णयाबद्दल मुलगा विलास नाराज होता. वडील दुसरं लग्न करत असल्याचा राग त्याच्या मनात खोलवर घर करून बसला होता.


विलासनं रागातून आपल्या एका मित्राच्या मदतीनं वडिलांच्या हत्येचा कट रचला. सकाळच्या सुमारास संधी साधून विलासनं वडिलांवर कुऱ्हाडीनं सपासप वार केले, यावेळी त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, ज्या दिवशी दिलीप राजगुरू यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार होती, त्याच दिवशी त्यांचा दुर्दैवी अंत झाला.


या घटनेमुळे रुई गावासह संपूर्ण जालना जिल्हा हादरला आहे. नात्यांमधील वाढता दुरावा आणि संताप किती टोकाला जाऊ शकतो, याचं हे भीषण उदाहरण असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. दरम्यान, तीर्थपुरी पोलीस ठाण्यात आरोपी मुलगा विलास राजगुरू आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशावरून तीर्थपुरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पवार यांच्याकडून सुरु आहे.

Comments
Add Comment

MPSC कडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; उमेदवारांना मोठा दिलासा

अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी मिळाली नवी मुदत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या;सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

म्हाडाच्या लॉटरीत प्रतिसाद न मिळणाऱ्या घरांची 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर विक्री करा;पुणे, शिरूर,

Shetkari Karjmafi update : कर्जमाफी योजनेत १ लाख ४० हजार शेतकरी अपात्र; प्राप्तिकर आणि अन्य कारणांनी वगळल्याची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

१६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसांत निधी जमा होणार मुंबई : राज्य सरकारने घोषित केलेल्या 'पुण्यश्लोक

Tuljabhavani Temple Land Case : तुळजाभवानीच्या १,६६८ हेक्टर जमिनींच्या कथित घोटाळ्यावर समिती आक्रमक; 'तातडीने ताबा घ्या, नाहीतर कोर्टात भेटू!'

पुणे : श्री तुळजाभवानी देवस्थानच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील

Devendra Fadnavis : गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मुख्यमंत्र्यांनी घेतला एमआयडीसीअंतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुंबई

Road Accident : घाटात मोठा अपघात, ब्रेक फेल झाला आणि ट्रकने SUV चिरडली; तीन वाहनांचे प्रचंड नुकसान

गडचिरोली : कोरची - कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावर बेडगाव घाटात बुधवारी (५ ऑगस्ट २०२६) सकाळी साडेअकराच्या सुमारास