Cyclone Shelter Center in Dapoli : दापोली तालुक्यातील चक्रीवादळ निवारा केंद्रासाठी महसूलकडून विनामूल्य जागा

मुंबई : कोकण किनारपट्टीवरील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मौजे ताडाचा कोंड येथील २०८७.०४ चौ. मी. शासकीय जमीन चक्रीवादळ निवारा केंद्र उभारणीसाठी देण्यास महसूल विभागाने मान्यता दिली आहे.


कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत हे केंद्र उभारल्यामुळे चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात स्थानिक नागरिकांना तात्काळ सुरक्षित निवारा उपलब्ध होईल. नियोजन प्राधिकरणाच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार या जमिनीचा विकास करणे आवश्यक असल्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे.



ताडाचा कोंड येथील स.नं. ६१/१ मधील एकूण २० हेक्टर ३७ आर क्षेत्रापैकी २०८७.०४ चौ. मी. जमीन 'जिल्हाधिकारी रत्नागिरी' यांना सुपूर्द करण्यात येणार आहे. ही जमीन प्रदान करताना शासनाने अटी लागू केल्या आहेत. ही जमीन 'भोगवटादार वर्ग-२' म्हणून धारण केली जाईल. या जमिनीचा वापर केवळ मंजूर निवारा केंद्राच्या प्रयोजनासाठी करणे बंधनकारक राहील. प्रयोजनासाठी वापर थांबवल्यास ही जमीन विनामोबदला शासनास परत करावी लागेल. जमिनीखालील सर्व खाणी आणि खनिजांवरील अधिकार शासनाकडेच राखीव राहतील.

कोकणच्या सुरक्षिततेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ताडाचा कोंड येथील जागा महसूल मुक्त आणि भोगवटा मूल्यरहित तत्त्वावर उपलब्ध करून दिल्याने निवारा केंद्राचे काम आता वेगाने सुरू होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक आधुनिक आणि लोकाभिमुख करत आहोत - चंद्रशेखर बावनकुळे

Comments
Add Comment

Jalgaon : रेल्वे प्रवाशांना लुबाडणाऱ्या विक्रेत्यांना दणका ! भुसावळ विभागाची मोठी कारवाई

Jalgaon : रेल्वे स्थानकांवर (Railway Station) प्रवाशांकडून पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ आणि पेयांसाठी निर्धारित दरापेक्षा

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित · ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील

Maharashtra News : राज्यातील प्रत्येक विभागात भव्य लोककला महोत्सव; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील लोककला आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्याच्या प्रत्येक विभागात भव्य

ST Employees Salary : एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; 11 ऑगस्टला खात्यात जमा होणार जुलैचे वेतन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी घेतली 'ताज हॉटेल्स'च्या सीईओंची भेट

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी