Green Asha Indian Ship : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईत दाखल

- होर्मुझ पार करत १५ हजार टन एलपीजीचा पुरवठा


मुंबई : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतीय तेलवाहू जहाज 'ग्रीन आशा' (Green Asha Indian Ship) आज म्हणजेच गुरुवार ९ एप्रिल रोजी मुंबईत दाखल झाले आहे. १५,००० टन एलपीजी घेऊन जाणारे हे जहाज मुंबईत आले आहे. या भारतीय जहाजाने होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडून मुंबईत प्रवेश केला आहे.


इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी जाहीर करण्यात आली आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची घोषणाही केली आहे. परिणामी, या काळात आणखी बरीच जहाजे भारतात येऊ शकतात.


'ग्रीन आशा' हे (Green Asha Indian Ship) जहाज १५,४०० टन एलपीजी घेऊन नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (जेएनपीए) येथे दाखल झाले आहे. जेएनपीएने म्हटले आहे की; "भारतीय ध्वज असलेल्या 'ग्रीन आशा' या एलपीजी जहाजाचे स्वागत करण्यात आले. या जहाजाने होर्मुझची सामुद्रधुनी यशस्वीपणे पार करून बीपीसीएल-आयओसीएलद्वारे संचालित जेएनपीएच्या लिक्विड बर्थवर नांगर टाकला."


'ग्रीन आशा'चे (Green Asha Indian Ship) आगमन महत्त्वपूर्ण आहे, कारण युद्ध सुरू झाल्यापासून होर्मुझची सामुद्रधुनी पार करून जेएनपीएमध्ये पोहोचणारे हे अशा प्रकारचे पहिलेच जहाज आहे. हे जहाज १५,४०० टन एलपीजी घेऊन आले आहे. प्राधिकरणाने म्हटले आहे, "जहाज, त्यावरील माल आणि सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. हे आगमन गुंतागुंतीच्या भू-राजकीय परिस्थितीतही सागरी कारवायांची कार्यक्षमता दर्शवते आणि देशाला अत्यावश्यक एलपीजीचा अखंड पुरवठा सुनिश्चित करते."


दरम्यान इराणकडून होर्मुज सामुद्रधुनी संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. इराणने आता जहाजांच्या वाहतुकीसाठी पर्यायी समुद्री मार्गांची घोषणा केली आहे.



सामुद्रधुनीचे पर्यायी मार्ग :


प्रवेश मार्ग : ओमान समुद्रातून होर्मुज सामुद्रधुनीत (Strait of Hormuz) प्रवेश करणारी जहाजे आता लारक बेटाच्या उत्तरेकडील भागातून प्रवास करतील. त्यानंतर ती पर्शियन आखाताच्या दिशेने पुढे जातील. संभाव्य धोक्यांपासून बचाव करत सुरक्षित प्रवेश मिळावा हा या मार्गाचा उद्देश आहे.


निर्गमन मार्ग : आखातातून बाहेर पडणाऱ्या जहाजांसाठीही नवीन मार्ग निश्चित करण्यात आला आहे. ही जहाजे लारक बेटाच्या दक्षिणेकडील भागातून ओमान समुद्राच्या दिशेने रवाना होतील.


इराणचे म्हणणे आहे की, या नव्या मार्गांचा उद्देश जहाजांना सुरक्षित आणि अखंड प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. जलमार्गात कोणतीही अप्रिय घटना टाळणे आणि आंतरराष्ट्रीय नौवहन सुरळीत ठेवणे, या दिशेने हा एक महत्त्वाचा उपक्रम असल्याचेही इराणने स्पष्ट केले आहे. (Iran-US-Israel War)

Comments
Add Comment

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि