Mumbai 'MB3' Data : मुख्यमंत्रीडेटा ट्रॅफिक'ची कोंडी फुटणार

'इक्विनिक्स'ची मुंबईत मोठी गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ६ हजार कोटींच्या 'एमबी३' डेटा सेंटरचे उद्घाटन;


मुंबई : विविध शासकीय योजनांच्या ऑनलाईन अंमलबजावणीत वारंवार अडथळा ठरणाऱ्या 'बँडविड्थ'च्या समस्येवर आता प्रभावी तोडगा काढला जाणार आहे. विशेषतः शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांच्या प्रक्रियेत अचानक वाढणाऱ्या इंटरनेट ट्रॅफिकमुळे प्रणाली कोलमडण्याचे प्रकार घडतात. अशा परिस्थितीत, अत्याधुनिक इंटरकनेक्टिव्हिटी आणि तत्काळ बँडविड्थ वाढविण्याची क्षमता असलेली डेटा सेंटर्स शासनासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केला.


जागतिक स्तरावरील आघाडीची डेटा सेंटर कंपनी 'इक्विनिक्स'च्या मुंबईतील 'एमबी३' या पहिल्या स्वमालकीच्या डेटा सेंटरचे उद्घाटन बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'वर्षा' निवासस्थानी करण्यात आले. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बळगन, मुख्य आर्थिक सल्लागार कौस्तुभ धवसे यांच्यासह कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


मुंबईत ३.७ एकर जागेवर उभारण्यात आलेल्या या प्रकल्पात कंपनीने ७५० दशलक्ष अमेरिकन डॉलर (सुमारे ६ हजार कोटी रुपये) इतकी मोठी गुंतवणूक केली आहे. हे केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यावर तिथे ४ हजार २०० हून अधिक कॅबिनेट्सची क्षमता उपलब्ध असेल. हे केंद्र केवळ अत्याधुनिक तंत्रज्ञानानेच सुसज्ज नाही, तर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित सेवांसाठीही सक्षम आहे. हायब्रिड मल्टी-क्लाउड सुविधेमुळे हे केंद्र जगभरातील ११ हजार ग्राहकांशी जोडले जाणार आहे.



यवतमाळच्या सौर प्रकल्पातून ऊर्जेची पूर्तता


पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाचा भाग म्हणून या डेटा सेंटरसाठी लागणारी ६० टक्के ऊर्जा सौर प्रकल्पातून मिळविली जात आहे. यासाठी यवतमाळ येथे २६.६ मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारण्यात आला आहे. तंत्रज्ञानाचा वापर करतानाच ऊर्जेची शाश्वतता जपण्याचा हा प्रयत्न स्तुत्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.


शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरताना तांत्रिक अडचणी येऊ नयेत, यासाठी बँडविड्थ वाढवणे गरजेचे आहे. इक्विनिक्सच्या या प्रगत केंद्रामुळे सरकारी प्रणालींची कार्यक्षमता वाढेल आणि पर्यायाने सर्वसामान्यांना त्याचा फायदा होईल.

Comments
Add Comment

Anil Kakodkar : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती

- 'जीएमआरटी' दुर्बिणीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणार; ६० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई :

Sindhu Mahakumbh : सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाचा महाराष्ट्रात गौरव; राज्यपालांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान

मुंबई : लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिंधू महाकुंभ (Sindhu Mahakumbh) उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक

Analog Paneer : पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर

Central Railway New Rule : 'धूम्रपान ते फेरीवाले…' रेल्वेत गैरप्रकार करणाऱ्यांची खैर नाही; रेल्वे कायद्यात झाले 'हे' मोठे बदल

मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! रेल्वे कायदा, १९८९ मधील अनेक तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आल्या

Maharashtra Rojgar Melava 2026 : महाराष्ट्रातील तरुणांसाठी मोठी संधी! राज्यात होणार १ हजार रोजगार मेळावे; मंत्री मंगलप्रभात लोढांचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई : राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व