Mockdrill In Navi Mumbai : नवी मुंबईत नागरी संरक्षण दलाचा भव्य 'मॉकड्रिल' सराव

नवी मुंबई : आपत्ती काळात नागरिकांचे संरक्षण आणि विविध यंत्रणांमधील समन्वय तपासण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत येणाऱ्या 'नागरी संरक्षण दल' (Civil Defence) वतीने नवी मुंबईत एका विशेष 'मॉकड्रिल'चे (प्रात्यक्षिक सराव) आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी नागरी संरक्षण दलाला नवी मुंबई महानगरपालिकेचे सहकार्य लाभणार आहे.


​ ​हे प्रात्यक्षिक गुरुवार, ९ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे. कोपरखैरणे येथील सेक्टर-११, बोनकोडे गाव येथील 'माजी सरपंच स्व. गणपतशेठ फकीरजी नाईक मैदान' येथे हा प्रात्यक्षिक सराव संपन्न होणार असून दुपारी २:०० ते ५:०० (दोन ते पाच) या वेळेत हे मॉकड्रिल पार पडणार आहे.


​ ​या सरावामध्ये केवळ नागरी संरक्षण दलच नाही, तर विविध शासकीय विभागांचा सक्रिय सहभाग असणार आहे. यामध्ये ​विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी, ​होमगार्ड्स आणि स्वयंसेवक, ​T.D.R.F. (ठाणे आपत्ती प्रतिसाद दल) आणि N.D.R.F. (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल), ​पोलीस प्रशासन, प्रसारमाध्यमे ​याशिवाय परिसरातील मान्यवर देखील या मोहिमेचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.


​ ​या मॉकड्रिलसाठी साधारणपणे २०० ते ३०० स्वयंसेवक आणि जवानांची उपस्थिती अपेक्षित आहे. केंद्र आणि राज्य सरकारद्वारे आयोजित हा एक राष्ट्रीय उपक्रम आहे. आपत्कालीन परिस्थितीत विविध यंत्रणा कशा प्रकारे धावून येतात, नागरिकांना सुरक्षित स्थळी कसे हलवले जाते आणि तातडीने मदत कार्य कसे राबवले जाते, याचा थेट सराव या निमित्ताने केला जाणार आहे. यामुळे स्थानिक प्रशासनाची सज्जता तपासण्यास मदत होणार आहे. ​


बोनकोडे आणि कोपरखैरणे परिसरातील नागरिकांनी या सरावामुळे गोंधळून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच या राष्ट्रीय उपक्रमाच्या यशस्वीततेसाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने मैदानावर उपस्थित राहावे, असे आवाहन उपनियंत्रक, नागरी संरक्षण (नवी मुंबई समूह) विजय ब. जाधव यांनी केले आहे.

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : खाण परवानग्यांचे अधिकार आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे

 परवानगी नियमात आवश्यक ते बदल करणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय मुंबई : राज्यभरात मोठ्या

Sunil Tatkare : महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर विविध कार्यक्रमांनी साजरी करणार - सुनिल तटकरे

मुंबई : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी जयंती व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या

Attack on Iran's Lavan Island oil refinery : युद्धविरामानंतर काही तासांतच इराणच्या लावन बेटावरील तेल रिफायनरीवर हल्ला

तेहरान : युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच इराणच्या लावन बेटावरील तेल रिफायनरीवर हल्ला

Dharavi Koliwada : धारावी कोळीवाड्याच्या सीमा निश्चित करा!

 महसूलमंत्री बावनकुळे यांचे आदेश; विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती, तीन महिन्यात अहवाल सादर

Chandrashekhar Bawankule : अवैध मुरुम उत्खनन दोषी अधिकाऱ्यांचीनंतरच बडतर्फी

 सोलापूरमधील चिंचोली एमआयडीसीमधील प्रकार  महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आदेश  २०० कोटींच्या दंड

GI Tag White Onion Production : जीआय टॅग मिळूनही अडचण; पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनात मोठी घट

रायगड : बदलत्या हवामानाचा मोठा फटका यंदा अलिबाग तालुक्यातील पांढरा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. यावर्षी