Sabarimala Temple Case : सबरीमला मंदिर प्रवेश प्रकरणात केंद्र सरकारने मांडली स्पष्ट भूमिका; म्हणाले...

केरळमधील सबरीमला मंदिराबाबत (Sabarimala Temple Case) केंद्र सरकारने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात आपली भूमिका मांडली. केंद्र सरकारने म्हटले की, पूजा स्थळी कोण जाऊ शकते हा “लिंगभेदाचा मुद्दा” नसून तो धार्मिक परंपरा, श्रद्धा आणि देवतेच्या विशिष्ट स्वरूपाशी संबंधित आहे.


सुनावणीपूर्वी दाखल केलेल्या आपल्या लेखी उत्तरात सरकारने नमूद केले की, सबरीमला येथे १० ते ५० वयोगटातील महिलांवरील प्रवेशबंदी ही भगवान अय्यप्पांच्या ‘नैष्ठिक ब्रह्मचारी’ स्वरूपामुळे आहे; ती कोणत्याही प्रकारच्या अपवित्रता किंवा हीनतेच्या भावनेवर आधारित नाही. केंद्र सरकारतर्फे उपस्थित सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले, “महिलांना प्रवेशाची परवानगी दिल्यास येथील पूजा-पद्धतीचे मूळ स्वरूपच बदलून जाईल, ज्यामुळे संविधानाने संरक्षित धार्मिक बहुलतेला धक्का बसेल. श्रद्धाळू म्हणजे पुरुष आणि महिला दोघेही शतकानुशतके सबरीमला मंदिरातील (Sabarimala Temple Case) स्थापित परंपरांनुसारच भगवान अय्यप्पांची पूजा करत आले आहेत.” सरकारने सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली की केरळमधील सबरीमला मंदिरात मासिक पाळीच्या वयोगटातील महिलांच्या प्रवेशावरील बंदी कायम ठेवावी.


सरकारने युक्तिवाद केला की हा मुद्दा पूर्णपणे धार्मिक श्रद्धा आणि संप्रदायाच्या स्वायत्ततेच्या कक्षेत येतो आणि तो न्यायालयीन पुनरावलोकनाच्या मर्यादेबाहेर आहे. केंद्राने पीठाला सावध करताना म्हटले की, धार्मिक प्रथा तर्कसंगतता, आधुनिकता” किंवा “वैज्ञानिक औचित्य” अशा निकषांवर तपासण्याचे मापदंड स्वीकारू नयेत. अशा प्रकारे परीक्षण केल्यास न्यायालये एखाद्या धर्माच्या अंतर्गत समजुतीऐवजी स्वतःचे तत्त्वज्ञान लादत असल्याचा अर्थ निघेल, असे सरकारने म्हटले. याशिवाय केंद्राने असेही नमूद केले की, “एखादी प्रथा तर्कसंगत आहे का, न्यायालयीन संवेदनांना अनुरूप आहे का किंवा परिवर्तनवादी संवैधानिक तत्त्वांशी सुसंगत आहे का, याची तपासणी करणे हे संवैधानिक पुनरावलोकन ठरत नाही. (Sabarimala Temple Case)


न्यायाधीश धार्मिक ग्रंथांची व्याख्या करण्यासाठी प्रशिक्षित नसतात आणि धार्मिक प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी आवश्यक संस्थात्मक साधनेही त्यांच्या जवळ नसतात, असेही सरकारने स्पष्ट केले. ही मते अशा वेळी मांडण्यात आली, जेव्हा सर्वोच्च न्यायालयात केरळमधील प्रसिद्ध सबरीमला मंदिरात (Sabarimala Temple Case) सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या २०१८ च्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या दीर्घकाळ प्रलंबित पुनर्विचार याचिकांवर सुनावणी होणार.

Comments
Add Comment

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

AK-203 Sher Rifle : संरक्षण उत्पादनात भारताची झेप; स्वदेशी AK-203 रायफलची यशस्वी निर्मिती

नवी दिल्ली : स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ‘मेक इन इंडिया’

Laptop Fire on Flight : हवेतच लॅपटॉपने घेतला पेट; विमानातील ५ प्रवासी जखमी, थरारक घटना

नवी दिल्ली : अमेरिकेत अटलांटा ते डॅलस असा प्रवास करणाऱ्या विमानात लॅपटॉपला अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली.

FSSAI Action : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासह बड्या कंपन्यांना FSSAIचा दणका; भ्रामक जाहिरातींवर १५० हून अधिक नोटिस

नवी दिल्ली : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासारख्या मोठ्या खाद्य कंपन्यांविरोधात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक

Odisha Ship Accident : बंगालच्या उपसागरात मालवाहू जहाज बुडाले; २४ क्रू मेंबर्सचा शोध सुरू, ओडिशाच्या किनाऱ्याजवळ मोठी दुर्घटना

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात शनिवारी पनामा ध्वज असलेले मालवाहू जहाज बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. हे जहाज

ISRO : इस्त्रोची प्रक्षेपण वाहन निर्मितीतून माघार; खासगी कंपन्यांकडे जबाबदारी

नवी दिल्ली : भारताच्या अंतराळ कार्यक्रमात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)